नवीन लेखन...

कमिशनरीणबाईंची पार्टी !

कमिशनरसाहेब जेवायला बसले. नोकरानी ताट आणि पाणी पुढे आणुन ठेवले. ताटात फक्त साध वरण आणि भात होता. हल्लीहल्ली त्यांना ताज इंटरकॉंन्टिनेंटलमधले जेवण पचत नसे. लगेच डायरिया व्हायचा. त्यामुळे महिन्याभरापासुन त्यांनी फाइव्ह स्टार हॉटेल , इंटरनॅशनल रेसिपिज , लेट नाइट पार्टीज , चिअरलीडर्स सर्व काही बंद केले होते. सकाळ संध्याकाळ फक्त साधं वरण आणि भात. तेवढ्यात कमिशनरीणबाई आल्या. कमिशनरसाहेबांचे जेवणात बिलकुल लक्ष नसलेले पाहुन त्यांना कळेना . हल्ली कमिशनरसाहेबांना झालंय तरी काय ? जेवणात पुर्वीसारखे लक्ष देत नाहीत . सकाळ संध्याकाळ नुसता भात चिवडीत बसतात.कमिशनरसाहेबांकडे लक्ष न देण्याचे त्यांनी ठरवले आणि विचारले ,

“ गडे किनई , मला एक विचारायच होतं .”

” हं “

” आमची भिशी मी या वेळेला आपल्या प्रायवेट जहाजावर ठेवु का ? मी दोन महिन्यांपुर्वी माझ्या सगळ्या मैत्रीणींना प्रॉमिस केलं होतं .”

” नको “

” तुमच किनई सगळं असंच . मी काहीही म्हटलं की नको. तुम्हाला मीच नकोशी झालीये “

कमिशनरीणबाईंचा आवाज लगेच बदलला. रुमालानी त्यांनी डोळे टीपले.

” काहीतरी बोलु नकोस. वेळ काय , प्रसंग काय त्याचा जरा विचार कर आणि मग बोल .”

“ ते काही नाही . मी माझ्या सर्व मैत्रीणींना प्रॉमिस केलंय की मी तुम्हाला आमच्या प्रायवेट जेटनी आमच्या प्रायवेट जहाजावर घेऊन जाणार आणि तिथे भिशी देणार . आणि भिशी पण काही जास्त नाहीये , फक्त शंभर कोटी पर हेड. आम्ही चारपाचच मैत्रीणी आहोत. “ कमिशनरीणबाई म्हणाल्या.

” मागच्या वर्षी हजार कोटी पर हेड ची भिशी लावते म्हणालीस , मी नको म्हणालो का ? पण या वर्षी नको. “

“ तेच म्हणतीये मी . मागच्या वर्षी तुम्ही माझ्यावर प्रेम करायचात . यावर्षी तुमचं प्रेमंच नाहीये माझ्यावर . “

कमिशनरसाहेबांनी किंगफीशर व्हिस्कीचा ग्लास उचलला. दोन घोट घेतले. बायकोला कसे समजवावे त्यांना कळेना . स्रीहट्ट , राजहट्ट , आणि बालहट्टापुढे आपले काहीही चालत नाही याची प्रचीती त्यांना आली. तरी त्यांनी बायकोला तिच्या हट्टापासुन दुर करण्याचा पुन्हा प्रयत्न केला .

” अग मी सध्या कमिशनर नाहीये . तुला कसे कळत नाही ? “

“ काहीतरी बोलु नका . तुम्हीच तर ट्वीटरवर म्हणालात ना की कमिशनर मीच आहे फक्त सस्पेंडेड आहे . ”

कमिशनरसाहेब परेशान झाले . त्यांनी फेकलेला बाण त्यांच्याकडेच बुमरॅंग होउन आला होता .

” त्या ट्वीटरमुळेच तर सगळा घोटाळा झाला ना . सगळ्या जुन्या मित्रांनी साथ सोडली . आता या किंगफिशर व्हिस्कीची सोबत आहे म्हणुन कसेतरी दिवस ढकलतोय झालं “

कमिशनरसाहेबांनी सुस्कारा सोडला . किंगफिशरचे दोन घोट घेतले . विषण्ण नजरेनी ग्लासकडे बघितले .

” आता आमची पार्टी पोस्टपोन होऊ शकत नाही . शिल्पा येणारे , प्रीती येणारे एवढेच काय , सुनंदाचीपण पुर्ण तयारी झालीये .”

“ सुनंदा ? कोण सुनंदा ? “ कमिशनरसाहेब चमकले

“ सुनंदा पुष्कर . ती पण आमच्या ग्रुपमधे आहे .”

कमिशनरीणबाईंनी बॉंबगोळा टाकला . कमिशनरसाहेबांचा आपल्या कानावर विश्नास बसेना .

” ती तुमच्या ग्रुपमधे कशी काय ? तुमचा तिचा काय संबंध ? “

“आधी नव्हती ग्रुपमधे . पण सहा महिन्यांपुर्वी थरुरांनी फोन केला . सुनंदालाही तुमच्या भिशी पार्टीत घ्या म्हणुन . फोन खरखर करत होता त्यामुळे नीटसे ऐकु आले नाही , पण मेंटर मेंटर असे काहीसे बोलत होते . तेव्हापासुन आम्ही तिलाही आमच्या भिशी पार्टीमधे घेतलंय. सध्या आम्ही सर्वजणी तिचेच तर ब्युटी प्रॉडक्टस वापरत असतो .”

हे ऐकताक्षणीच कमिशनरसाहेब घेरी येऊन कोचावरुन खाली कोसळले . हल्ली थरुर , सुनंदा अशी नावे कानावर पडली की त्यांना अशींच घेरी येते .

— निखिल नारायण मुदगलकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..