आपण सर्व वाचकांच्या स्नेहामुळे ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकाची आवृत्ती अवघ्या १५ दिवसांत संपली, व दुसऱ्या आवृत्तीला देखील प्रचंड मागणी आहे. हे सर्व शक्य झाले ते निव्वळ आपल्यासारख्या दर्दी जिज्ञासू वाचकांमुळेच. गेले महिनाभर ‘एका दिशेचा शोध’ या
पुस्तकाचे विविध पैलू आम्ही सातत्याने आपल्यासमोर आणत होतो. पुस्तकातील विचार आपल्यासारख्या सुजाण वाचकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा एकमेव उद्देश होता. त्या अनुषंगाने विविध व्यक्तींनी आपापले विचार देखील मांडले. आतापर्यंतचा हा चर्चेचा प्रवास आम्ही येथेच थांबवित आहोत. येथून पुढे जी चर्चा होईल ती ज्यांनी पुस्तक वाचले असेल त्यांच्याकडून. पुस्तकांमधून व्यक्त झालेल्या भावना वा अनुभव आपल्या जीवनाशी देखील निगडीत असू शकतात. आपल्या भावना वा अनुभव इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ आपणांस उपलब्ध करुन देत आहोत. पुस्तकातील विचार हे निव्वळ पुस्तकामध्ये बंदिस्त न राहता ती लोकचळवळ व्हावी अशी आमची इच्छा आहे. यासंदर्भात आपल्या काही कल्पना असल्यास कृपया त्या मांडाव्यात. आपण आतापर्यंत दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत. असाचा लोभ कायम रहावो, ही सदीच्छा!
तुम्ही तुमचे मत फेसबूकवरील http://www.facebook.com/pages/Eka-Dishecha-Shodh/126104087443744 ह्या लिंकवर जाउन नोंदवू शकता.
— तुषार भामरे
Leave a Reply