कवितेच्या मागे धावता – धावता
मी कधी म्हातारा झालो ?
मला कळलेच नाही…
माझे तारुण्य चोरून रोज
अधिक तरुण होणारी माझी कविता
कधी म्हातारी झालीच नाही…
माझी कविता आता रोज
तरुणांना प्रेमात पडल्याशिवाय
क्षणभरही शांत बसत नाही…
तिच्या प्रेमात पडलेले
माझे म्हातारे हृदय आता
फडफडल्या शिवाय रहात नाही…
आता मला तिच्यावर कोणतीच
बंधने घालता येत नाही
आणि स्वैर सोडता येत नाही…
मी तरुणच राहायचे ठरविले
तर माझी कविता आता
तरुण राहणार नाही…
तिचे तारुण्य हेरून मी
आता तरुण झालो तरी
जगण्यात मजा उरणार नाही…
©निलेश बामणे
Leave a Reply