असेच एकदा परत कधीतरी, मंतरलेल्या कातरवेळी..
पुन्हा नव्याने जगायला, लागेनही मी कदाचित राणी…
तुझ्या डोळ्यातला सूर्योदय, माझ्या मनातल्या संध्याकाळी..
लय तुझ्या श्वासाची अन् अंतरीतील माझ्या गाणी…
मोकळा सोडेन गळा माझा आणि उघडून ठेवीन हृदय..
किती जरी वाटले डोक्याला की नको नको तो विषय..
असेच बेभानपणे विचारेन ओरडून परत परत जगाला..
की “मुझको आवाज़ दो, छुप गए हो सनम तुम कहाँ ?”
असेच अलगद उत्स्फूर्तपणे गा तू पण मग पुन्हा “मैं यहाँ..”
आणि असाच रोज वेड्यासारखा, शोधत राहेन तुला “मैं यहाँ से वहाँ”…
— ह्रुशिकेश दातार
Leave a Reply