नवीन लेखन...

काजवा जेंव्हा सूर्याला भेटला…

साहित्य क्षेत्रातील माझं अस्तित्व हे एखाद्या काजव्या इतकेच आहे असं मी व्यक्तीशः मानतो. पण याच काजव्याला साहित्य क्षेत्रातील एक सूर्य काही दिवसापूर्वी जेंव्हा प्रत्यक्ष भेटला तेंव्हा माझा आनंद व्दिगुणीत झाला होता. त्या सूर्याच्या भेटीचा क्षण हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोल्यवान क्षणांपैकी एक होता. एखाद्या कवीच्या कविता आपण शाळेत असताना, वाचल्यात, पाठ केल्यात आणि त्यांचा अभ्यास करून परिक्षेत गुण ही मिळविलेत अशा कवीच्या प्रत्यक्ष सहवासात त्यांच्याशी चर्चा करण्यात काही तास घालवितो तेंव्हा सहाजिकच त्या काही तासांच मूल्य हे आपल्या आयुष्यात आपण घालविलेल्या कित्येक वर्षांपेक्षा अधिक असते. त्यांच्या कविता वाचून आंम्ही प्रकाशित झालो होतो. काजवा असूनही एका सूर्याला भेटलो होतो. त्या सूर्याच नाव होत महाकवी मंगेश पाडगांवकर आमचे एक ओळखीचे आदरणीय व्यक्तीमत्व आणि मुंबई नागरिक समितीचे अध्यक्ष श्री. दशरथ तळेकर साहेब आणि आमचे एक पत्रकार आणि कवी मित्र निलेश मोरे यांच्या सोबत अथवा त्यांच्या मुळेच मंगेश पाडगांवकरांना प्रत्यक्ष भेटण्याचा सूवर्णयोग माझ्या आयुष्यात स्वतःहून चालत आला. त्याबद्दल मी त्यांचा ऋणीच राहिण. संध्याकाळी सहाच्या सुमारास आंम्ही पाडगांवकरांच्या घराची बेल दाबली. माईनीं दरवाजा उगडला आणि आंम्हाला आत बोलावले. घरातील पोशाखावरच पाडगांवकर आंम्हाला सामोरे आले. तळेकर साहेबांनी आमची त्यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी अतिशय उत्साहातच आमचे स्वागत केले. कोणतीही मोठी व्यक्ती उगाच मोठी होत नाही याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला. आंम्ही घरात पाऊल ठेऊन सोफ्यावर बसतो न बसतो तो आमच्या समोर बसत पहिल्यांदा आंम्हाला चहा घेणार की कॉफी ? हा प्रश्न केला तेंव्हा त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातील आदर आणखी व्दिगुणीत झाला होता. एखाद्या मान व्यक्तींसारखे त्यांनी आमच्याशी बोलायला सुरूवात करत सरळ मुळ मुद्दयालाच हात नाही घातला. आता वयोमानाने त्यांना थोड ऐकायला कमी येत असल्यामुळे नाईलाजाने आंम्हाला त्यांच्या समोर जोरात बोलाव लागत होत. चहापाणी झाल्यावर वाचन, व्याकरण, शुध्दलेखन आणि भोषेतील चढउतार इ. विषयांवर त्यांचे अमुल्य विचार त्यांनी आमच्या समोर अलगद मांडायला सुरूवात केली मधे एखादी विनोदी कविता अथवा किस्सा ही ऐकवला. तेंव्हा त्यांच्या विनोदी स्वभाव ही प्रत्यक्ष अनुभवता आला. आंम्ही तेथे असेपर्यतच आमच्या लक्षात आले होते की आजही या वयातही त्यांचे साहित्यिक दौरे वगैरे अव्याह्तपणे सुरू आहेत. ते वयाने म्हातारे झालेले असले तरी आजही मनाने एखाद्या तरूणालाही लाजवतील इतके तरूण आहेत. जणू त्यंच्या कवितांनीच त्यांना चिरतारूण्य बहाल केलेल असाव असेही वाटून जाते.

आमच्या सारख्या नवोदित कवींसाठी अथवा कवितेच्या क्षेत्रात हात-पाय मारणार्‍यांसाठी ते एक चालत – बोलत विद्यापिठच आहेत असं म्ह्टल तर ते ही वावग ठरू नये. जवळ्पास तासभर चर्चा झाल्यानंतर पोशाख चढवून ते आमच्या सोबत फोटो काढण्यासाठी तितक्याच उत्साहाने सज्ज झाले. तेंव्हा मी खर्‍या अर्थाने त्यांच्यासमोर नतमस्तक झालो. माणूस फक्त मोठा असून भागत नाही मोठेपण त्याच्या अंगी असावे लागते याचा प्रत्यय तेंव्हा मला तेथे प्रत्यक्षात आला. माझ्या मित्राने सोबत आणलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन वगैरे झाल्यावर आंम्ही आमची प्रकाशित पुस्तके त्यांना भेट म्ह्णून दिली आणि दुसर्‍या पुस्तकांवर त्यांची स्वाक्षरी ही घेतली त्यांच्या भेटीची आठवण म्ह्णून . त्यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली या चर्चे दरम्यान त्यांनी आंम्हालाही बोलत केल. सुरूवातीला आंम्ही त्यांच्याशी बोलताना चाचपडत होतो पण नंतर त्यांनीच आंम्हाला बोलत केल. त्यांनी आंम्हाला ऐकविलेल्या वात्रटीका आणि त्यांची सर्वांनाच आवडणारी कविता ‘प्रेम म्ह्णजे प्रेम असत’ आमच्या आग्रहाखातर जेंव्हा त्यांनी ऐकवली तेंव्हा आमच्या कानाचे पारणेच फिटले कारण मंगेश पाडगांवकरांची ‘प्रेम म्ह्णजे प्रेम असत’ ही कविता मी त्यांच्या आवाजात प्रत्यक्षात त्यांच्या समोर बसून ऐकत होतो या पेक्षा मोठे भाग्य ते काय ? जवळ्पास दोन तास त्यांच्या सहवासात आनंदाने घालविल्यानंतर आंम्ही त्यांचा निरोप घेतला. निघताना कव्यक्षेत्रातील या सूर्याच्या पायाल मी हात लावला आणि त्यांच्या आशीर्वाद रूपाने त्यांचा किंचित प्रकाश माझ्या सोबत आणला आणि एक काजवा पुन्हा एकदा सूर्याला भेटून धन्य झाला…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 418 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..