कायस्थ समाजातील नवरात्रीच्या हळदीकुंकु समारंभावर ही एक कविता. व्हॉटसऍपवरुन व्हायरल झालेय.
नवरात्री च्या हळदीकुंकवाची करू तयारी,
कुणी पूजे सवाश्णी कुणी पूजे कुमारी,
पंचमी अष्टमी दिवस खास ठरी,
आज हिच्या तर उद्या तिच्या घरी।
पाच सात अकरा नक्की आकडा ठरी,
कुणाकडे असती एकवीस जणी,
या हळदीकुंकवाची धामधूम भारी,
नटून थटून जमती साऱ्या जणी।
तयारी याची खास च असे,
आठवून सारे कसे जमवावे लागे,
काजू बदाम अक्रोड मनुका बेदाणे,
खडीसाखर खोबरे असावे नेटके।
केवडा गुलाब खसखस ऊंची अत्तरे,
हळद कुंकू शेंदुर बुक्का असे सारे,
सोबत गुलाबपाणी अन सुगंधी तेल ही लागे,
फणी-कंगवा आरसा सुवासिक गजरे।
साजुक तुपाच्या काजळी ची काजळे,
एकजण सहाणे वर चंदन उगाळे,
पाय धुण्यासाठी दूध ही लागे,
अक्षतां बरोबर झेडू शेवंती ची फुले।
खिरापती च्या पाच फळांच्या पाच तऱ्हा,
ओटीसाठी लागती साळी च्या लाहया,
शोधून आणाव्या मावळी काकड्या,
घरीच करून विडयाला लवंग लावा।
मसाला दूधाची तर गोष्टच न्यारी,
चारोळ्या वेलची असे मसाला जरी,
केशराची काडी त्यावर हवीच हवी,
आटवलेल्या दूधाचा असे रंग केशरी।
तयारी ठेवण्यास खास कायस्थी थाट,
ठेवणीतल्या चांदी च्या वस्तू निघती छान,
अत्तरदाणी गुलाबदाणी कुंकवाचे करंडे,
वाटया तबक अन दूधासाठी पेले।
लेवून साज सगळयाजणी दिसती ख़ास,
दूधाबरोबर जेवणांत पुरणपोळी चा मान,
पंचपक्वान्नाच्या ताटात बिर्ड्या चा घमघमाट,
सोबत अळूची वडी अन मसालेभात,
हे सगळे कमी, म्हणून फक्त या दिवसा,
असे सोमरस अमृत प्राशनाचा रिवाज,
ह्या कार्यक्रमाची उत्स्तुकता भारी,
याला लागतात कायस्थांच्याच नारी।
असे हे हळदीकुंकू त्याची ही तयारी,
दिवस असे एक अन कौतुक वर्षभरी,
याचा उत्साह अन लगबग सारी,
करण्यास सज्ज असे कायस्थ नारी|
Leave a Reply