सर्वप्रथम या संस्थेला मी मनापासुन मानाचा मुजरा आणि लाख-लाख धन्यवाद देतो कारण;‘कास्प’ ही एक अमेरिकान संस्था आहे आणि भारतातील गरीब गरजु मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत करते.फक्त मदतंच म्हणता येणार नाही तर भारतीय विध्यार्थांवर दाखविलेली फार मोठी सहानुभुती आणि त्यांच्या ड़ोक्यावर या संस्थेनं दिलेलं हे एक छञ
आहे.आणि या छञाची सावली मी स्वता घेतलेली आहे.माझं १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण फक्त मी या संस्थेच्या जिवावर घेतलेलं आहे आणि आजही लाखो विध्यार्थी घेत आहेत.आज पंधरा ते वीस वर्षापुर्वी लोकांना खायला मिळणंही मुश्किल होतं अशा परिस्थीतीत या संस्थेने पायाच्या नखापासुन ते ड़ोक्याच्या केसापर्यंत लागणार्या सर्व वस्तु या संस्थेने गरिब मुलांसाठी पुरवलेल्या आहेत ज्या वस्तु या मुलांनी कधी स्वप्नात पण पाहील्या नसतील अशा वस्तुंचा उपभोग केवळ कास्प या संस्थेमुळं आमच्या सारख्या गरीब मुलांना घेता आला आहे.या वस्तुमध्ये (वह्या, पुस्तके, पेण, पेन्सिल, कंपास, शाळेचा गणवेश, चप्पल, पावसाळी चप्पल, हेअर आँईल, टुथपेस्ट, ब्रश, चादर, रेनकोट, स्वेटर, दिवाळी स्विट, फेस्टीवलसाठी नविन कपड़े, उच्चशिक्षणासाठी अर्थीक मदत ) अशा अनेक कारणाने मुलांना मदत केली आहे.एक स्टँड़रलायजेशन काय असतं किंवा एखाद्या श्रीमंताच्या मुलानं ज्या प्रकारे शाळेत जावं तसं स्टँड़ंर्ड़ या संस्थेने या मुलांना दिलं आहे.भले १० वी नंतरचं शिक्षण मी स्वताच्या पायावर उभं राहुन घेतलं आहे पण १० पर्यंतचंच शिक्षण जर मला घेता आलं नसतं तर तुमच्यापुढ़े लिहणं तर सोड़ाच तर कुठेतरी मोलमजुरी करताना दिसलो असतो.माणसाच्या जिवनाला कलाटणी देणारी शिक्षण ही ऐकमेव अशी बाब आहे कि,जिच्यामुळे माणुस होत्याचा नव्हता होतो.मी पदवीनंतर पुढ़े शिकु शकलो नाही याचं दुःख मला आयुष्यभर होईल कारण माणुस किती जरी
िकला तरी तो परिपुर्ण होणं शक्य नाही.
इथे या संस्थेचा उल्लेख मला यासाठी करावा वाटला कारण;शिक्षणाचं महत्व आज विकसीत देशांना कळंल आहे आणि आपल्या देशाबद्दल
त्यांना सहानुभुती वाटते आपल्या देशाकड़े ते एक विकसनशील देश म्हणुन पाहतात म्हणुन ही संस्था गरिब मुलांना आज मदत करते.खरं तर भारतातील भ्रष्ट राजकरणाची खरं तर मला लाज वाटते कारण तुमच्या देशातील मुले आज शिक्षण घेतात ती केवळ परराष्टांच्या मदतीमुळेच भारतातील या भ्रष्ट राजकारण्यांना मी इतकंच सांगेल कि, स्विस बँकेत जमा केलेल्या रकमेपैकी जर १ टक्का रक्कम जरी प्रत्येकाने गरीब, अनाथ, मागासलेल्या शेतकर्यांच्या मुलांसाठी जर वापरलीत तर आजपर्यंत केलेली थोड़ीफार पापं तरी यामुळे धुवुन निघतील भले तुम्हाला या गरिब देशाची भोळीभाबड़ी जनता काही शिक्षा करणार नाही परंतु मेल्यानंतर काय? अरे स्वताच्या आईची (भारतमातेची) ईज्जत लुटणार्यांनो तुम्हाला नरकातही जागा मिळणं मुश्किल आहे.
याच राजकरणामुळे हि संस्थाही फारकाळ टिकली नाही तिथेही नेहमिप्रमाणे अफरा-तफर झाली आणि कास्प संस्थेचे विलीनिकरण सी. एफ.आय. या संस्थेत झाले आणि आज सी. एफ.आय. हि संस्था भारतामध्ये कार्यरत आहे.या दोन्ही संस्थेतील संचालक मंड़ळांना माझा मानाचा मुजरा आणि लाख-लाख सालाम……..
प्रमोद पाटील
— प्रमोद पाटील
Leave a Reply