नवीन लेखन...

काही विशिष्ट लोकांनाच डास अधिक का चावतात याची कारणे

पावसाळ्याच्या दिवसात अस्वच्छता आणि पाण्याच्या डबक्यांमुळे मच्छरांची पैदास अधिक वाढते. प्रवासादरम्यान बाहेर फिरताना, रेल्वेमध्ये, घरामध्ये हाता-पायांवर डास डंख मारतात. पण काही विशिष्ट लोकांना डास चावण्याचे प्रमाण आजूबाजूच्या व्यक्तींपेक्षा थोडे अधिक असते.

त्यामागची वैज्ञानिक कारणं.
*तुमचा रक्तगट ‘O’ असल्यास*Journal of medical entomology च्या 2004 सालच्या अहवालानुसार, इतर रक्तगटांच्या व्यक्तींच्या तुलनेत डास ओ रक्तगटाच्या व्यक्तींकडे अधिक आकर्षित होतात.

या अभ्यासानुसार डास सर्वप्रथम ओ रक्तगट त्यानंतर ए रक्तगट त्यानंतर बी रक्तगट आणि सगळ्यात शेवटी एबी रक्तगटाच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात. त्यामुळे ओ रक्तगटाच्या व्यक्तींनी डासांपासून स्वतः चा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण डासांमुळे मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया, झिका यासारख्या आजारांचा धोका वाढतो.
गर्भवती स्त्रिया वयोवृद्ध किंवा लहान मुलांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांमध्ये डासांचा डंख होण्याचा धोका अधिक असतो. the annals of tropical medicine and parasitology 2004 च्या अभ्यासानुसार सामान्य स्त्रियांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांना डास चावण्याचा धोका दुप्पट असतो. मेटॅबॉलिक रेट अधिक असणार्यांयमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या निर्मितीचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे त्यांच्याकडे डास आकर्षित होतात. गर्भवती स्त्रियांचे मेटॅबॉलिझम वाढलेले असते त्यामुळे त्यांना डास चावण्याची शक्यताही वाढते.

तुमची जणुकं mosquito magnet असल्यास तुमच्या शरीरातील जणूकं तुम्हांला mosquito magnet बनवतात.the journal Infections, Genetics and Evolution 2013 सालच्या अभ्यासानुसार शरीरातील काही विशिष्ट जणूकं डासांना आकर्षित करतात.the journal Infections, Genetics and Evolution नामक ही जणूकं शरीराच्या वासामध्ये असतात. त्यामधील केमिकल्समुळे डास अधिक जवळ येतात. तसेच डास विशिष्ट भागावर चावतात. ‘Olfaction in Mosquito-Host Interactions’ या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार डेंगीला कारणीभूत असणारे डास (Aedes aegypti) डोक्याजवळ अधिक चावतात.

श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.thehealthsite.com

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..