कैरी पिकल्या त्यांचा आंबा झाला की त्याचे गुणधर्म पुर्ण बदलतात. आंबा हा चवीला गोड,थंड व वात व पित्त दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
पिकलेल्या आंब्याचे औषधी उपयोग आता आपण पाहूया:
१)रोज १ आंबा खाऊन त्यावर तासाभराने दुंध प्यायल्यास वजन वाढते व झोप ही चांगली लागते.
२)आंब्याचा रस बाळंतीण बाईला नियमीत प्यायला दिल्यास तिचे स्तन्य वाढते.
३)लघ्वीची तक्रार असल्यास जसे लघ्वी कमी होणे,जळजळ १ ग्लास आंबा रस+ १/४ ग्लास गाजराचा रस + १/४ चमचा सैंधव हे मिश्रण प्यावे.
४)आंब्याची ओली साल आंघोळी पुर्वी १/२ तास अंगावर चोळल्यास त्वचा नितळ व निरोगि होते.
५)आंब्याच्या कोईचे चुर्ण ताकातून प्यायल्यास जुलाब कमी होतात.
६)आंब्याच्या सोयीचे चुर्ण हिरड्यांना लावल्यास त्यातून येणारा रक्त स्त्राव,पू येणे कमी होते व हिरड्या मजबूत व्हायला मदत होते.
आंबे खायचा अतिरेक केल्यास पोटात खळखळून जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply