ओवा आपण सर्वच जणांच्या परिचयाचा.तसेच भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात ह्याला एक वेगळे आणी महत्त्वाचे स्थान आहे.ओव्याचा वापर हा जेवणामध्ये फोडणीला,भजी बनवताना,ओव्याची कढी,अशा माफक पदार्थांमध्ये हा वापरला जातो.पण खरोखरच ओव्यामुळे त्या पदार्थांना एक वेगळी छान चव त्या पदार्थाला येते.तसेच ब-याच मंडळींना ह्याचे घरगुती औषधी प्रयोग माहीत देखील असणार.
ओव्याचे लहान क्षूप असते आणी त्याला लागलेली ही बारीक फळे असतात.ओवा चवीला तिखट कडवट असतो आणी उष्ण असतो.हा शरीरातील वात आणी कफ दोष कमी करतो पण पित्त वाढवितो.म्हणूनच पित्ताचा त्रास तसेच एॅसीडीटी मुळव्याधीचा त्रास असणा-यांनी ह्याचा वापर करू नये त्याचप्रमाणे उन्हाळयात ह्याचा वापर करू नये.
१)अजीर्ण आणी पोटदूखीचा त्रास होत असल्यास १ टीस्पून ओवा खाऊन त्यावर एक घोट गरम पाणी प्यावे.
२)जंतांचा त्रास वारंवार होत असल्यास विड्याच्या पाना सोबत ओवा खावा ही तक्रार लगेच कमी होते.
३)खोकला येत असल्यास ओवा आणी खडीसाखर हे मिश्रण विड्याच्या पानासोबत खावे.
४)पावसाळयात मधुमेह असणा-या व्यक्तींना वारंवार लघवी होते अशा वेळी १ चमचा ओवा + ४ चमचे बेलाच्या पानांचा रस हे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.
५)४ चमचे ओवा + २ चमचे एरंडेल तेल तव्यावर परतून घ्या व त्याच्या पुरचुंडीने सांधेदुखी,मुरगळणे,मुकामार लागला असल्यास त्या भागावर शेकावे.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply