हि वनस्पती न ओळखणारी भारतीय व्यक्ती अत्यंत दुर्मिळ असेल.बहुतेक करून शाकाहारी जेवणामध्ये ह्याचा वापर जास्त केला जातो.फोडणी मग ती कशाला ही असो चिवडा,उपिट,पोहे,आमटी,डाळ,फोडणीचा भात,भाज्या अशा एक ना अनेक पदार्थांना फोडणी देण्यासाठी ह्याचा देखील आवर्जून वापर केला जातो कारण ह्याच्या विशिष्ट रूचीवर्धक सुगंधाने (इथे मन मोहक वापरणे इष्ट वाटले नाही)प्रत्येक पदार्थाची लज्जत वाढवितो.असा हा कढिपत्ता .
ह्याचा व्रुक्ष असतो.ह्याच्या पानांचा उपयोग जेवणात केला जातो.चवीला कडू,तिखट,तुरट अशी मिश्र चव आणी थंड असा हा कढिपत्ता शरीरातील वात,पित्त आणी कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवतो.
ह्याचा उपयोग देखील आपण घरगुती उपचारांमध्ये करू शकतो बरे का!अगदी डोळयांपासुन ह्रूदयाचा पर्यंत ब-याच अवयवांना हा हितकर आहे.चला मग पाहूयात ह्याचे औषधी उपयोग.
१)एॅसीडीटी मध्ये २ चमचे कढिपत्ता रस+१ चमचा लिंबु रस+ २ चमचे खडीसाखर हे मिश्रण चाटावे.
२)गजकर्ण,खरूज,इसब अशा त्वचा रोगात कढिपत्त्याची चटणी बनवून ती गरम करून त्या भागावर लावावी.
३)ज्यांना वारंवार जंत होतात त्यांनी साधारण पणे १५-२० दिवस १ चमचा कढिपत्ता चटणी गुळात मिसळून पाण्यासोबत गिळावी.
४)मार लागणे,ठेचलागणे,मुरगळणे ह्यामुळे आलेल्या सुजेवर कढिपत्ता + हळद ह्याच्या पोटीसाने शेकावे.
५)बरेचदा गांधीलमाशी,मधमाशी,कोळी असे किटक अंगावर चिरडून मरतात आणी त्या जागी विखार होतो आणी मग आग होणे,खाज सुटणे,पुरळ येणे अशा तक्रारी सुरू होतात तेव्हा कढिपत्ता चुरून त्या भागावर लावावा.
कढिपत्ता अतिप्रमाणात खाल्ल्यास तोंडाला कोरड पडते,संडासला घट्ट होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply