उन्हाळा आला रे आला कि थंडगार कलिंगड खाल्ल्यावर खरेच अगदी आल्हाददायक वाटते.उन्हाची झळ हि काहि काळा पुरती का होईना बरीच कमी होते. ह्याला उन्हाळ्यातील थंडाव्याची झुळूक म्हटल्यास वावगे ठरणार नाही,नाही का!
मस्त चाट मसाला घालून,किंवा मिरपुड व मीठ घालून देखील ह्याच्या फोडी रूचकर लागतात बरं का.कधी कधी तळपत्या उन्हातून आल्यावर ह्याचा ग्लासभर लाल लाल रस पिणे म्हणजे अमृत तुल्यच होय.हो पण हा रस फक्त उन्हाळ्यात क्वचित घेतल्यास चालू शकतो बरे अन्यथा फळ खाणे उत्तम.
कलिंगडाचा वेल असतो,ह्याच्या काळी व पांढरी अशा दोन जाती आहेत.काळी गोल असते तर पांढरी लांबट असते.पांढऱ्या जातीची कलिंगडे मोठी व गोड असतात.कलिॅगड हे फळ चवीला मधुर,थंड,कफकर व वात पित्तनाशक आहे.
चला आता ह्याचे औषधी गुणधर्म पाहूया:
१)पौष्टिक म्हणून कलिंगडाच्या बिया मगज ६ ग्राम+६ ग्राम खडीसाखर एकत्र करून खावी.
२)उन्हाळ्यात १ कप कलिॅगड रस+१/२ चमचा जीरे+१ चमचा खडीसाखर तीन वेळा घ्यावे शरीरातील उष्णता कमी होते.
३)१ ग्लास कलिंगड रस+२ चमचे लिंबू रस+ १ चमचा खडीसाखर हे मिश्रण जेवणापुर्वी घ्यावे त्याने मळमळ,तोंडाचा बेचव पणा,छातीत जळजळ,उल्ट्या ह्या तक्रारी कमी होतात.
४)कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग+ कापूर+ चंदन हे मिश्रण अंगास लावल्यास अंगाची आग कमी होते.
५)बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास १ ग्लास कलिंगड रस+ १ चमचा आवळकाठी चुर्ण जेवणापुर्वी १ तास घ्यावे व मग जेवावे.
कलिंगड सेवनाचा अतिरेकाने जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply