हि प्रत्येकाची आवडती.हिला बोली भाषेत तवसे देखील म्हणतात.हिची कोशिंबीर,रायते अगदी लाजवाब लागते.गरमी मध्ये शरीर व मन थंड करणारी हि काकडी सगळ्यांचीच लाडकी.
हिचा उपयोग स्वयंपाका मध्ये जसा होतो तसाच हिचा वापर आपण घरगुती औषध उपचारात देखील करू शकतो.
हिचा वर्षायू रोमश वेल असतो.आणि ह्याच वेलीला हि रसरशीत फिक्कट हिरव्या रंगांची फळे लागतात जे चवीला गोड व थंड असते.त्यामुळेच हे शरीरातील पित्तदोष कमी करते व वात व कफ दोष वाढविते.
आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू:
१)अंगाची जळजळ होत असल्यास काकडीचा लेप लावावा व हिच्या बिया थंडाई मध्ये घालून देतात.
२)लघ्वी कमी होत असेल तर काकडीचे बी, जिरे व साखर पाण्यात घालून केलेला काढा प्यावा फायदा होतो.
३)अंगावर पांढरे जात असल्यास १ ग्राम काकडी बी मधला गर + १ ग्राम पांढ-या कमळाच्या पाकळ्या वाटून त्यात जिरे व खडीसाखर घालून ७ दिवस खावे.
४)उन्हाळयात उष्णता कमी करायला काकडी चिरून त्यात खडीसाखर व लिंबाचा रस घालून खावी.
५)छातीत जळ जळ होत असल्यास ४ चमचे काकडी रस+खडीसाखर हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी घ्यावे.
६)गव्हाचे पदार्थ खाऊन जर अजीर्ण झाले तर त्यावर उतारा म्हणून काकडी खावी.
अतिमात्रेत काकडी खाल्ल्यास सर्दी होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply