हे चवीला कडू असले तरी आहे मात्र फारच पौष्टिक बरे का.ह्याच्या कडू चवीमुळे ब-याचं मंडळींना हे आवडत नाही.पण ह्यात असणा-या औषधी गुणांमुळे प्रत्येकाने ही भाजी खायलाच हवी.
ज्यांना हि भाजी आवडते ते ह्याची तळलेली कापं,भजी,चटणी,भाजी असे विविध प्रकार करून खातात.
कारल्याचा वर्षायू वेल असतो.व आपण खातो ते कारले म्हणजे ह्या वेलीला लागणारे फळ होय.कारले हे चवीला कडू तिखट असते व उष्ण असून त्रिदोषघ्न असते.
ह्याचा उपयोग जसा स्वयंपाकात केला जातो तसाच घरगुती उपचारात देखील आपण कारले वापरू शकतो.
१)संडास मधून आव पडत असल्यास कारल्याचा रस तीळ तेलात मिसळून प्यावा.
२)ज्यांना कृमी होण्याची सवय असते त्यांनी १/४ कप कारल्याचा रस+१/४ चमचा वावडींगाचे चुर्ण सकाळी उपाशी पोटी प्यावे व त्यावर तासाभराने एरंडेल तेल प्यावे.
३)छातीत कफ साचून खोकला येत असल्यास १/२ कप कारल्याचा रस +२ चमचे मध+१/४ चमचा मिरीपूड हे मिश्रण घ्यावे.
४)ज्या इसब व खरूज ह्यात स्त्राव होतो त्यात कारल्याचा रस व हळद एकत्र करून लावावी.
५)अंगात बारीक ताप,अंगदुखी,तोंडास पाणी सुटणे,भुक न लागणे ह्यात कारल्याचे बारीक तुकडे+दालचिनी+काळी मिरी+वेलची रात्रभर पाण्यात भिजत घालून दुस-या दिवशी दिवसभर हे पाणी थोडे थोडे प्यावे.
कारले खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरात वात वाढून संडास व लघ्वी साफ न होणे व अंगमोडून येणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply