आयुर्वेदामध्ये अनेक दुधांचे गुणधर्म सांगितले आहेत.पण त्यातील जे दुध मानव प्राणी प्यायला वापरतो तेवढ्याच दुधांचे गुणधर्म आपण ह्या लेखात पहाणार आहोत.
१)गाईंचे दुध:
हिचे दुध चवीला गोड,थंड,स्निग्ध,पचायला जड,शरीरात क्लेद व चिकटपणा अल्प प्रमाणात निर्माण करते,कफकर,वातपित्त कमी करणारे, संडासला व लघ्वीला सुकर करणारे,मानसिक आजारबरेकरणारे,दाहनाशक,शक्तिवर्धक, विषनाशक(असे म्हणतात कि जर गाईने चुकून एखादी विषारी वनस्पती खाल्ली तरी त्याचे विष हे गाईच्या दूधात उतरत नाही).
२)म्हशीचे दुध:
चवीला गोड,थंड,पचायला गाईच्या दुधापेक्षा जड,स्निग्ध,भरपूर क्लेद व चिकटपणा निर्माण करणारे,बलकारक,शुक्रधातूची वाढ करणारे,झोप आणणारे,संडास व लघ्वी बांधून ठेवणारे,भुक कमी करणारे आहे म्हणून भस्मक रोगात हे द्यावे असे सांगितले जाते.
३)शेळीचे दुध:
गोड,तुरट,थंड,पचायलाहल्के,स्निग्ध, पित्तनाशक,बलदायक,पौष्टीक,शुक्रधातू वाढविणारे,भुक वाढविते,संडास बांधून ठेवणारे असून टिबी ह्या आजारात अत्यंत पथ्यकर आहे.
४)मेंढीचे दुध:
गोड,पचायला जड,वातनाशक,कफ व पित्त वाढविणारे,उष्ण असते.हे दुध दमा असणाऱ्या व्यक्तिंनी मुळीच पिऊ नये.
५)स्त्रीचे दुध:
वातपित्त नाशक,डोळ्यांनाहितकर,रक्तदोषनाशक,गोड,तुरट व पचायला हल्के असते.
असे हे वेगवेगळ्या दुधांचे गुणधर्म आपण ह्या लेखामध्ये पाहिले.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Leave a Reply