नवीन लेखन...

किचन क्लिनीक – काही दुधांचे गुणधर्म

आयुर्वेदामध्ये अनेक दुधांचे गुणधर्म सांगितले आहेत.पण त्यातील जे दुध मानव प्राणी प्यायला वापरतो तेवढ्याच दुधांचे गुणधर्म आपण ह्या लेखात पहाणार आहोत.

१)गाईंचे दुध:

हिचे दुध चवीला गोड,थंड,स्निग्ध,पचायला जड,शरीरात क्लेद व चिकटपणा अल्प प्रमाणात निर्माण करते,कफकर,वातपित्त कमी करणारे, संडासला व लघ्वीला सुकर करणारे,मानसिक आजारबरेकरणारे,दाहनाशक,शक्तिवर्धक, विषनाशक(असे म्हणतात कि जर गाईने चुकून एखादी विषारी वनस्पती खाल्ली तरी त्याचे विष हे गाईच्या दूधात उतरत नाही).

२)म्हशीचे दुध:

चवीला गोड,थंड,पचायला गाईच्या दुधापेक्षा जड,स्निग्ध,भरपूर क्लेद व चिकटपणा निर्माण करणारे,बलकारक,शुक्रधातूची वाढ करणारे,झोप आणणारे,संडास व लघ्वी बांधून ठेवणारे,भुक कमी करणारे आहे म्हणून भस्मक रोगात हे द्यावे असे सांगितले जाते.

३)शेळीचे दुध:

गोड,तुरट,थंड,पचायलाहल्के,स्निग्ध, पित्तनाशक,बलदायक,पौष्टीक,शुक्रधातू वाढविणारे,भुक वाढविते,संडास बांधून ठेवणारे असून टिबी ह्या आजारात अत्यंत पथ्यकर आहे.

४)मेंढीचे दुध:

गोड,पचायला जड,वातनाशक,कफ व पित्त वाढविणारे,उष्ण असते.हे दुध दमा असणाऱ्या व्यक्तिंनी मुळीच पिऊ नये.

५)स्त्रीचे दुध:

वातपित्त नाशक,डोळ्यांनाहितकर,रक्तदोषनाशक,गोड,तुरट व पचायला हल्के असते.

असे हे वेगवेगळ्या दुधांचे गुणधर्म आपण ह्या लेखामध्ये पाहिले.

(क्रमश:)

(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..