आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो हे गाणे झिम्मा फुगडी खेळताना पुरवापार पासून आवडीने गायले जाते.हो हो आज आपण नव्याने ओळख करून घेणार आहोत फळांचा राजा आंबा ह्याची.
धगधगत्या उन्हाळ्यात मनाला आल्ल्हाद देणारे हे फळ.उन्हाळ्यामध्ये आतुरतेने ह्या फळाच्या आगमनाची वाट पाहिली जाते.असा हा फळांचा राजा.लहान मूलांपासून अगदी वृध्द मंडळीचा देखील हा आवडता आहे.
ह्याच्या जाती तरी किती,लंगडा,केसर,
भिष्म,हापूस,मानकुराद,मुशेराद,तोतापुरी,रायवळ इ अनेक जाती आहेत ह्याच्या आणी प्रत्येकाची चव वेगळी बरं का.
बरं ह्या पासून खायचे प्रकार किती करतात मुरंबा,आमरस,आम्रखंड,आंबा वडी,आंब्याचे साठ,रायते इ हे झाले पिकलेल्या आंब्याचे.तर कारी असताना लोणचे,रायते,पन्हे,चुंदा इ प्रकार फारच सुरेख लागतात.
चला मग आता ह्याची माहिती पाहूयात ना.आंब्याचा ३०-१२० फूट पर्यंत उंच वृक्ष असतो.पाने ४-१२ इंच लांब असतात फुले छोटी असतात व मादक सुगंध येतो त्यांना.फळ हे वेगवेगळ्या आकाराचे असले तरी कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर लाल असते.
आता प्रथम भागामध्ये आपण कैरीचे उपयोग पाहूयात व गुणधर्म जाणून घेऊया.कैरी जी तुरट असते ती शरीरातील वात दोष वाढविते तर आंबट कैरी हि शरीरातील पित्त दोष वाढविते.कैरी उष्ण असते.
चला मग ह्याचे औषधी उपयोग पाहुया:
१)जुलाब होत असल्यास तुरट चवीच्या कैरीचा रस थोडा थोडा प्यावा.
२)आंबट कैरी पासून तयार केलेले पन्हे हे तहान,अंगाची आग शांत करते व तृप्तीचा अनुभव देते.
3)ज्या व्यक्तिंना कामा अथवा व्यवसाया
निमित्त वारंवार उष्णतेशी संपर्क येतो त्याच्या डोळ्याचा थकवा घालवायला कैरीचा किस डोळ्यावर ठेवावा.
४)उन्हाळ्यात कच्च्या कैरीवर सैंधव मीठ घालून बेताने खाल्ल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होतो.
५)आंबट कैरीची साल सुकवून केलेली आंबोशी तोंडाची चव वाढविते तसेच हि चिंचे एवजी आमटी भाजीत वापरली जातात.
कैरी अतिप्रमाणात खाल्ल्यास व अजीर्ण होऊ शकते.
(क्रमश:)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply