ह्या भाजीच्या बाबतीत तशा आपल्या प्रत्येकाच्याच भावना तशा मिश्र कारण हि तसेच आहे म्हणा हि भाजी आपल्या राष्ट्रात तयार होणारी भाजी नसून इंग्रजांनी आपल्या सोबत हिला येताना आणली होती.तशी हि भाजी काही वाईट नाही हं त्याच्या गो-या सायबा सारखी.हो अगदी तुम्ही हिला गच्चीत एखाद्या मोठ्या कुंडीत लावले तरी चांगली किचन गार्डनींगची हौस पुरी करता येईल तुम्हाला.
ह्या कोबीची फुले दिसतात भारी देखणी व चवीला देखील सुरेख लागतात.अगदी सुकी भाजी,भजी,कोशिंबीर,लोणचे सगळेच छान लागते ह्या भाजी पासून बनविलेले.मी तर अगदी झुणका व पराठे सुद्धा बनवून खाते ह्याचे मस्त लागतात.अगदी कांदा नसताना कांदे पोहे खाणे जरा जड जाते ना मग काय कोबी घाला कांद्याच्या बदली व पहा कसे झकास लागतात पोहे ते.
जसा ह्या भाजीचा वापर स्वयंपाकात होतो तसाच घरगुती उपचारात देखील आपण हि भाजी वापरू शकतो.पण प्रथम तिचे गुण पाहूयात.कोबी हा चोवीस गोड थंड व शरीरातील कफ व पित्त हे दोष कमी करणारा असून वात दोष वाढवितो.
आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)थकवा जाणवणे,दम लागणे,तोंडास कोरड पडणे,छातीत जळजळ ह्या ५० ग्राम कोबी पाणी न घालता कुकर मध्ये वांफवा व त्याचा रस काढा नंतर त्यात १ चमचा मध व १/२ चमचा जिरेपूड घालून सुर्योदयाच्या वेळी तो रस प्यावा व तासभर काही खाऊ नये.ह्या प्रयोगाने ह्रदयात बळ मिळते.
२)पोट बिघडणे,शौचास भसर होणे,छातीत आग होणे,तोंडास पाणी सुटणे,वजन कमी होणे ह्या तक्रारीकडे १/२ कप कोबी रस+ १ चमचा मध+ १ चमचा गाजर रस हे मिश्रण जेवणा सह थोडे थोडे प्यावे.
३)थंडीत त्वचा रूक्ष होणे,फुटणे,खाजते ह्यात कोबीचा रस व कोथिंबीर रस एकत्र करून त्वचेवर लावावा.
४)लघ्वीची आग होणे,लघ्वी थोडी थोडी होणे,कंबर दुखणे ह्यात १ ग्लास कोबीरस +धणे पूड १ चमचा + २ चमचे खडीसाखर २-३ वेळा विभागून घ्यावे.
५)हिरड्यांतून पू रक्त येत असल्यास कोबीचा रस तोंडात धरून गुळण्या कराव्या व नंतर गाल व हिरड्यांना तीळ तेल लावावे.
कोबी खायचा अतिरेक केल्यास पोटात वात धरू शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply