तेल ही गेले तुप ही गेले हाती आले धुपाटणे हि मराठी मधील एक प्रचलित म्हण आहे.अशीच काहीशी गत आपण आपल्या आरोग्याची करून घेतली आहे ती देखील तुपा बद्दल आपल्या मनात असलेल्या गैरसमजांमुळे.तुप खाणे आरोग्यास चांगले नाही,तुपा हृदयाचा आरोग्यास हानीकारक आहे,तुप खाल्ल्याने कोलेस्टेराॅल वाढते इ.त्यामुळे बरेच लोक वनस्पती तुप अर्थात डाल्डाचा सर्रास वापर आपल्या आहारात करतात.पण डाल्डा म्हणजे तेलावर प्रक्रिया करून केलेला पदार्थ तो आपल्या हृदयाच्याच नव्हे तर संपुर्ण शरीराच्याच आरोग्यास किती हानीकारक आहे ह्याची कल्पनाचा केलेली बरी.
आणी हो कोणत्याही वस्तूचा अतिरेकी वापर हा आपल्या शरीराला बाधणारच मग त्याला फक्त तूपच कसे अपवाद असू शकते.
तुप हा प्राणीज द्रव्यातील सर्वोत्तम स्नेह आहे.कारण दुधापासून तूप बनविताना त्यावर अनेक संस्कार झालेले असतात.जसे दुधतापवून त्यापासून काढलेल्या सायीला विरजण लावून त्यापासून दही बनविले जाते,ह्या दह्याचे ताक करतात व ताक घुसळून त्यापासून लोणी काढतात,व लोणी कढवून त्यापासून तूप तयार होते.अर्थात सुरूवातीला व शेवटअग्निसंस्कार,किण्व प्रक्रिया,व मंथनसंस्कार असे अनेक संस्कार ह्या तुपावर झालेले असतात.
हे साजुक तुप सामान्य तापमानात देखील मऊ रवाळच रहाते व गरम हवामानात ते पुर्ण वितळते.पण जर तुम्ही डाल्डा पाहिलात तर तो कोणत्याही तापमानात गोठलेला व घट्टच असतो.मग असा हा कायमच गोठलेल्या स्वरूपात असणारा डाल्डा तुमच्या शरीरात गेल्यावर हृदयाच्याही धमन्यांमध्ये जाऊन न गोठल्यास त्यात नवल ते काय?
तुप हे आपल्या आरोग्यास खरोखरच उपकारक आहे.ह्याचा आहारात नियमीत वापर केल्याने शरीर सुदृढ रहाते,बुध्दी तल्लख होते,रोग प्रतिकार शक्ती वाढते,व वार्धक्याकडे होणारी शरीराची वाटचाल मंदावते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Leave a Reply