चिंचेचा उपयोग आपल्या स्वयंपाकात बऱ्याच प्रमाणामध्ये केलजातो.आमटी,भाजी,चटणी,
पाक,सरबते,तसेच आता तर इमली जेली देखील मिळू लागली आहे.चाट चे पदार्थ तर चिंच खजुर चटणी शिवाय कल्पनाच केली जाऊ शकत नाही.
अगदी बाई गरोदर असेल तर तिला देखील चिंचा खाव्याशा वाटतात का विचारले जाते.
चिंचेचा मोठा वृक्ष असतो साधारण पणे आवळ्याच्या पानां प्रमाणे बारीक पाने असतात.तसेच त्याला लागलेली कच्ची चिंच हिरवी मातकट रंगांची टणक असते व पिकल्यावर ती पुर्ण मातकट रंगांची होते व आतील बी टणक व त्यावर कठीण आवरण असणारी होते.
कच्ची चिंच आंबट,उष्ण,पित्त,रक्त,कफ दुषित करणारी असून वातनाशक आहे.
पिकलेली चिंच आंबट,गोड,उष्ण,वात,कफनाशक व पित्तकर आहे.
आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूया:
१)तोंडास घाण वास येणे,जीभेवर साका जमणे,तोंडास चव नसणे ह्यात जेवणा सह कच्ची चिंच व सैंधव घालून केलेला ठेचा खावा.
२)अजीर्ण होऊन मळमळ होणे,उल्टी होणे ह्यात पिकलेली चिंच सैंधव लावून तोंडात धरून चघळावी.
३)लघ्वीची जळजळ,पोटात वात धरणे ह्यात २ चमचे चिंचेचा कोळ+१ चमचा मध+१चमचा साखर हे मिश्रण घ्यावे.
४)किटक चावलेल्या ठिकाणी चिंचोका भाजून अग्र नुसता उगाळून दंश भागी लावावा.
५)१ कि चिंच २ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावी व सकाळी कोळून गाळून त्यात २ किलो साखर घालावी व पाक करावा.हे तयार सरबत ४ चमचे १ ग्लास पाण्यात मिसळून रात्री घेतल्यास बद्धकोष्ठाचा त्रास कमी होते.
चिंच अतिमात्रेत खाल्ल्यास अम्लपित्त होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply