हे फळ जरी भारतीय नसले तरी त्याने आपल्या स्वयंपाक घरात एक महत्त्वाचे स्थान त्याने प्राप्त केले.असा कुठलाही पदार्थ नाही ज्या मध्ये आपण ह्याचा वापर करत नाही भाजी असो,आमटी असो,उसळ असो किंवा भाजी असो टाॅमेटो घातला की त्या पदार्थांची चव भलताच वाढते.
तसेच आता टाॅमेटो चटणी,सलाड,साॅस,केचअप तसेच बरेच चाटचे पदार्थ ह्यात हा हमखास वापरला जातो.तर असे लाल बुंद टोमॅटो सुप करायला देखील वापरतात.
खरोखरच ही भाजी दिसायला फारच आकर्षक असते.तो कच्चा खायला देखील छान लागतो.आणी मुख्य म्हणजे आपण ह्याची लागवड आपल्या बागेत करू शकतो.कारण ह्याचे झुडूप असते व त्याला हि फळे लागतात.
कच्चा टोमॅटो हिरव्या रंगांचा असतो चवीला आंबट असून थंड गुणाचा व तिन्ही दोष दुषित करणारा असतो.तर पिकलेला टोमॅटो हा लाल रंगांचा व थंड गुणाचा असून वातपित्तनाशक व कफकर असतो.
चला आता ह्याचे औषधी गुणधर्म पाहूयात:
१)मांसाहार केल्यावर त्या सोबत पिकलेला टोमॅटो खावा म्हणजे छातीत होणारी जळजळ,तहान लागणे,पोटातील जड पणा कमी होतो.
२)नीट पथ्य पाळून ज्या व्यक्तीला शरीरातील अनावश्यक चरबी कमी करायची असेल त्यांनी रोज पिकलेला टोमॅटो १००-२०० ग्राम खावा.
३)कोरडा खोकला,दम,थकवा,छातीत दुखणे ह्यात १ कप टोमॅटोचा रस+१ चमचा हळद पुड+ २ चमचे खडीसाखर हे मिश्रण रोज सकाळी प्यावे.
४)अजीर्ण,पोटफुगणे,चिकट पातळ संडास होणे,भुक न लागणे ह्यात १ कप टोमॅटो रस+१/४ चमचा मिरपुड+४ चिमूट हिंग+१/४ चमचा काळे मीठ हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे व दुपारी हलके जेवावे व रात्री उपवास करावा.असे १-३ आठवडे करावे फायदा होतो.
५)मन व शरीराचा थकवा,झोप शांत न येणे,तोंड कडू होणे,उल्टी होईल असे वाटणे ह्यात १ ग्लास टोमॅटो रस त्यात २ चमचे खडी साखर घालून रोज संध्याकाळी ४-५ च्या दरम्यान प्यावा ह्याने शरीर व मन ताजे तवाने व्हायला मदत होते.
६)गर्भवती स्त्रीने रोज खडीसाखर घालून टोमॅटोचा रस प्यावा त्यामुळे पोट साफ रहाते,थकवा कमी होतो व बाळंतपणा नंतर दुध चांगले सुटते.
कच्चा टोमॅटो कधीच खाऊ नये तसेच टोमॅटो वापरावा पण बिया काढुन.कारण जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर तो टोमॅटोच्या बियांनी वाढतो.
अतिमात्रेत टोमॅटो खाल्ल्याने पोट बिघडते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply