हि मध्यम उंचीच्या सुगंधी व्रुक्षाची पाने असतात.ह्यांचा उपयोग आपल्या स्वयंपाकात तसा पुष्कळ होतो असे नाही पण काही खास व्यंजनांमध्ये हटकून ह्याचा वापरहोतो.पुलाव,बिर्याणी,मसालेभात,तसेच गरम मसाला ह्यात ह्याचा वापर होतो.ह्याच्या विशिष्ट सुगंधाने हे पदार्थ जास्त खमंग लागतात ह्यात वादच नाही.
गोड,तिखट,कडू अशी ह्याची मिश्र चव असते आणी हि उष्ण असतात.ह्यास बोलू भाषेत तेजपत्ता असे ही म्हणतात.ह्याचे देखील काही औषधी उपयोग आहेत ते आता आपण पाहूयात.
१)१/२ चमचा तमालपत्र चुर्ण+४ चमचे लिंबाचा रस + १/२ ग्लास कोमट पाणी हे मिश्रण जेवताना मध्ये मध्ये थोडे थोडे घेतल्यास अन्नपचन नीट व्हायला मदत होते.
२)ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांनी १/२ चमचा तमालपत्र पूड +१/४ चमचा हिंग+ २ चमचे लिंबाचा रस+१ चमचा आल्याचा रस हे मिश्रण गरम पाण्या सह घ्यावे.
३)वारंवार जुलाब होत असल्यास १/२ चमचा तमालपत्र चुर्ण+१/२ चमचा सुंठ पूड गरम पाण्यासोबत घ्यावी.
४)ज्या स्त्रीयांना वारंवार गर्भपात होण्याची सवय असते त्यांनी १/२चमचा तमालपत्र पूड + ६ चमचे केळफूलाचा रस हे मिश्रण सलग तीन महीने घ्यावे पण क्रूपया वैद्यांचा सल्ला देखील घ्यावा हि विनंती.
५)सर्दी,डोकेदुखी,नाक चोंदणे ह्यात तमालपत्र पूड हुंगावी कफ पातळ होऊन पडतो.
तमालपत्र अधिक मात्रेत घेतल्यास पित्ताचा त्रास आणी शरीरातील धातू क्षीण होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply