चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हो हाच तो भोपळा ज्यात बसून वाघाला चुकवून म्हातारी लेकिच्या घरी धष्टपुष्ट व्हायला गेली होती बरं का!ह्या लाल भोपळ्यांचे घारगे,वडे,भाजी,कोशिंबीर,भजी,चटणी सगळेच कसे रूचकर लागते.
हा भोपळा मोठा असला तरी वेलींवर उगवतो बरं का.जसे स्वयंपाकात ह्याचा भरपूर उपयोग होतो तसाच घरगुती उपचारात देखील आपण हा वापरू शकतो.
लाल भोपळा हा चवीला गोड,तुरट व थंड असून शरीरातील पित्त व वात हे दोष कमी करतो व कफ दोष वाढवितो.
चला ह्याचे औषधी उपयोग पाहू:
१)अतिभूक लागून वारंवार काही तरी खावेसे वाटते तेव्हा भोपळ्याची उकडून केलेली भाजी किंवा तूपात तळलेले वडे खावे.
२)तोंडास रूची नसणे व अन्न नकोसे होणे ह्यात लाल भोपळ्यांचे दह्यात केले भरीत जीरे व तूपाची फोडणी व सैंधव घालून खावे.
३)धावपळ दगदग ह्यामुळे त्रास होत असल्यास १ कप भोपळ्याचा रस+१ चमचा साखर+ १/४ चमचा सैंधव घालून प्यावे.
४)भोपळ्याच्या बिया सोलून आतील मगज तूपात तांबूस परतून त्यात साखर घालून लहान लहान लाडू करावे व ते अशक्तपणा मध्ये तसेच लहान मुलांना खायला द्यावेत.
५)आजारी व्यक्तीला भोपळा उकडून वाटून त्यात साजूक तूप व जि-याची फोडणी देऊन केलेले सूप द्यावे.
भोपळा खायचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply