साधारण पणे वाटाण्याच्या आकाराची हि फळे असतात आणि त्या फळांच्या आत काळी चमकदार बी असते.ह्याचे काटेरी झाड असते.
ह्यांना एक विशिष्ट असा उग्र वास येतो.ब-याच
जणांना कदाचित हे फळ माहित नसेल तसा ह्याचा आपल्या स्वयंपाकामध्ये फार वापर होतो असे देखील नाही पण गोवा कोकण प्रांतामधील लोक ह्याचा थोडाफार वापर आपल्या काही विशिष्ट खास व्यंजनांमध्ये आवर्जुन करतात.
प्रामुख्याने ह्याचा उपयोग माशाच्या जेवणामध्ये केला जातो.कर्ली,बांगडे ह्या माशांची आमटी करताना अथवा शाकाहारी पदार्थ म्हणजे गोव्यात बनविले जाणारे भाज्यांचे खतखते ह्यामध्ये तिरफळे वापरली जातात.कारण माशांच्या आमटी मध्ये वापरण्याने मासे पंचायला सुलभ होतात.आणि त्या पासून अजीर्ण होत नाही.तसेच ह्याच्या विशिष्ट वासाने माशांचा विशिष्ट गंध कमी होतो(मी दुर्गंध म्हणणार नाही कारण आमचे शरीर ह्या माशांवरच पोसलेले आहे.
तिरफळे चवीला तिखट,कडू असतात आणी ती ब-यापैकी उष्ण असतात.त्यामुळे ती शरीरातला वात व कफ दोष कमी करतात व पित्तदोष वाढवतात.
जसे ह्याचा उपयोग भोजनात होतो तसाच ह्याचा उपयोग काही घरगुती उपचारांमध्ये देखील केला जातो बरे का!
चला मग पाहूयात तिरफळाचे औषधी उपयोग:
१)वातामुळे अंगात कळा येत असतील तर १/४ चमचा तिरफळ चुर्ण मधातून घ्यावे.
२)अजीर्ण झाले असल्यास तिरफळ चुर्ण गूळामध्ये मिसळून त्याच्या गोळ्या कराव्यात व त्या तूपासोबत घ्याव्यात.
३)पोटात गॅस झाला असल्यास १/४ तिरफळ चूर्ण+२ चिमूट हिंग+१ चमचा लिंबाचा रस हे मिश्रण घ्यावे गॅस कमी होतो.
४)जुन्या आमवाता मध्ये १/४ चमचा तिरफळ + १चमचा एरंडेल हे मिश्रण रात्री झोपताना ४२ दिवस घ्यावे ह्याने पुष्कळ फरक पडतो.
५)पोटात दुखून उचक्या येत असल्यास १/२ चमचा तिरफळ चुर्ण+२ चमचे मध+१ चमचा साजुक तूप हे मिश्रण वारंवार चाटावे.पण एॅसीडीटी असणा-यांनी हा उपाय करू नये.
अतिप्रमाणात ह्याचे सेवन केल्याने एॅसीडीटी,व तोंडात उष्णतेचे फोड येणे ह्या तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply