आपल्या पैकी बरेच जण आवडते म्हणून दही मिळेल त्यावेळेस हवे तसे खात असतो आणी कधी कधी तर आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या तक्रारीचे मुळ कारण आपण खात असलेले हे दहीच आहे म्हणून.
तर मग दही कधी खाऊ नये ह्याचे काही नियम आयुर्वेद सांगते ते आपण पाहूयात:
१)दही रात्रीच्या वेळेस मुळीच खाऊ नये.
२)दही गरम करून खाऊ नये कारण गरम दही हे आयुर्वेद विषवत मानते.
३)अदमुरे दही तर मुळीच खाऊ नये हा पण जर संडासला घट्ट होण्याची सवय अथवा त्रास असेल तेव्हा काही दिवस उपचाराचा भाग म्हणून आपण ह्याचे सेवन करू शकता पण नियमीत नाही.
४)दही हा पदार्थ आपल्या आहारामंध्ये रोज खाऊच नये.
५)दही नुसते कधीच खाऊ नये तर त्यामध्ये सैंधव,खडी साखर असे काही तरी घालून खावे.
६)उन्हाळा,वसंत ऋतू,व शरद ऋतुमध्ये दही खायचे नाही कारण ते शरीरास अपाय कारक ठरू शकते तसे पाहता निसर्ग नियमच असा आहे की ह्या ऋतूत दही चांगले विरजत देखील नाही.
७)संडास मधून आव पडणे,डोके दुखी,सर्दी,पडसे,त्वचारोग,अम्लपित्त,संडासला आगहोणे,लघ्वीचीजळजळ,रक्तदोष,कोड,
अंगावर सूज येणे,रक्तस्राव,पांडूरोग,चक्कर येणे ह्या तक्रारी असल्यास दही खाऊ नये.
८)दही हे मासे,अंडी,मांस,फळे,भाज्या,कडधान्य ह्यात मिसळून कधीच खाऊ नये कारण असे केल्यास शुक्रदोष,डोळ्यांचे विकार,त्वचा रोग,रक्त विकार,अंगावर किंवा आतील अवयवांना सूज येणे,रक्तविकार होऊ शकतात.
म्हणूनच दही खा पण जरा जपून.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Leave a Reply