ह्यालाच पांढरा दुधी असे देखील म्हणतात.ह्याचे किती प्रकारची व्यंजने बनत असतील हे सांगणे जरा कठिणच आहे,पण सगळ्यांचा आवडता दुधी हलवा म्हणा,खीर म्हणा,चटणी म्हणा,भाजी म्हणा,सुप इ पदार्थ करतात हे मला माहिती आहे.
जसा ह्याचा उपयोग भाजीमध्ये होतो तसाच ह्याचा औषधी उपयोग देखील आहेत बरं का!
ह्याचे वेल असते जे दुरवर पसरते ह्या वेलीला हि फिकट हिरव्या रंगांचा लांबट अशी फळे लागतात.ज्याचा उपयोग खाण्याकरिता केला जातो.
हा चवीला गोड,थंड असते व पित्तनाशक व कफकारक असतो.आता ह्याचे औषधी उपयोग पाहुया:
१)हातापायांची आग होत असल्यास तळव्यांना रात्री झोपताना दुधीभोपळ्याचा किस बांधुन झोपावे.
२)हातापायांना भेगा पडल्यास दुधीभोपळ्याचा रस व एरंडेल तेल मिसळून लावावे.
३)शौचास कधीपातळ कधी घट्ट किंवा चिकट होत असेल तर जुन झालेला दुधीभोपळा घ्यावा व त्याचे सालकाढुन तो किसुन त्याचा किस तुपावर परतावा व त्यात जीरे,मिरी,खडीसाखर व सैन्धव घालून खावा.
४)ज्यांना कायम संडासला साफ न होण्याची तक्रार असते त्यांनी जेवणात रोज दुधाची भाजी घ्यावी.
५)नियमीत ४चमचे दुधी रस+१/४ चमचे जिरे+१ चमचा मध हे मिश्रण पहाटे सुर्योदयापुर्वी रिकाम्या पोटी घ्यावे व तासभर काही खाऊ नये.हा प्रयोग ४२ दिवस करावा ह्याने शरिरातील उष्णता कमी होते व जेवणास रुची येते तसेच ह्रूदयाला देखील बळ मिळते.
कोवळा दुधी अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात व जुन दुधी खाण्याचा अतिरेक केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply