किस बाई किस दोडका किस हे फुगडी गीत मंगळा गौरीमध्ये लय फेमस हाय बुवा.तर आज आपण नव्याने ओळख करून घेऊयात ह्या दोडक्याची.अहो काही नाही हे दोडके आकांराने दिसते अगदी घोसाळ्याच सारखे फक्त ह्याला धारदार शिरा असतात बरं का.चला आपण ह्याला घोसाळ्याचा सावत्र भाऊच म्हणूयात ना.मग आता दोडके व घोसाळे ह्यात गफलत होणार नाही ना.
हिचा देखील बराच पसरलेला वेल असतो.वेल लावल्यापासून सव्वा महिन्यात फळे येतात.आपण खातो ते दोडके हे त्या वेलीचे फळ.हि दोडकी देखील कडू व गोड अशा दोन प्रकारची असतात.ह्यातील कडू औषधी करिता वापरतात तर गोड खायला वापरतात.
दोडके हे चवीला गोड व थंड आणी तिन्ही दोष कमी करणारे असते.आता त्याचे औषधी उपयोग पाहूयात.
१)मुलांना अंगात ताकद भरण्याकरिता आठवड्यातून तीन वेळेस हि भाजी जेवणात द्यावी.
२)ज्यांना संडासला साफ होत नाही त्यांनी रात्रीच्या जेवणात उकडलेले दोडके सैंधव व जिरे पूड घालून खावे.
३)ज्या व्यक्तिंना कृमी होण्याची सवय असते त्यांनी दोडक्याची कोरडी भाजी एक दिवस आड खावी.
४)तोंडाला रूची नसल्यास दोडक्याच्या काढलेल्या शिरा +चिमूटभर मीठ+१/२ इंच आले हे मिश्रण चावून येणारी लाळ थुंकावा व नंतर चोखोही थुंकावा.
५)शरीरातील धातूक्षीण होऊन चिडचिडे पणा व मानसिक त्रास वाढल्यास जो थकवा येतो तो कमी करण्यासाठी दोडक्याचे सूप बडीशेप ,जिरे व धणेपूड घालून त्यावर साजूक तूपाची फोडणी देऊन प्यावे.
दोडके खाण्याचा अतिरेक केल्यास संडासमधून आव पडू शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply