द्राक्षांचा उपयोग आपण खाण्यासाठी तर करतोच.पण त्या पासून मनुका,बेदाणे,वाईन असे विविध प्रकार बनविले जातात.तसेच आपण औषध म्हणून घेत असलेले द्राक्षासव हे देखील बऱ्याच जणांच्या आवडीचे.
हि द्राक्षे खायला खरोखरच सुरेख लागतात.त्यातल्यत्यात गोड असतील तर अगदी अमृततुल्यच म्हणाना.
हिंदुस्थान भर हि द्राक्षे पिकवीली जातात ह्याच्या पांढरी,हिरवी आणी काळी असे तीन प्रकार असतात.द्राक्षांचा वेल असतो व तो लावल्यापासून ३ वर्षात त्यास फळे येतात.
द्राक्षाचे फळ कच्चे असताना जड,तुरट आंबट असते तर पिकलेले फळ हे चवीला गोड,थंड व शरीरातील वात,पित्त दोष कमी करते.
आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)अशक्तपणा मध्ये द्राक्षे,खडीसाखर,मध व पिंपळी हे मिश्रण खावे तरतरी येते.
२)वारंवार तहान लागत असल्यास काळी द्राक्षे व ज्येष्ठमध काढा हे मिश्रण प्यावे.
३)घसा कोरडा पडणे,तोंड सुकणे,जीभ कोरडी होणे,तोंडास चव नसणे ह्यात द्राक्षा व आवळकाठी हे मिश्रण वाटून तुपात मिसळावे व त्याची गोळी करून तोंडात चघळावी.
४)पित्ताचा त्रास होत असल्यास काळी द्राक्षे रस १/२ ग्लास+१ चमचा जीरे पूड+ १/४ चमचा सैंधव हे मिश्रण १-३ वेळा घ्यावे.
५)१/२ ग्लास द्राक्षाचा रस+१ चमचा बडीशेप हे मिश्रण पित्त वाढून आलेल्या तापात द्यावे त्याने लघ्वीचे प्रमाण वाढून शरीरातील विशाल बाहेर फेकले जातात.
द्राक्षे अतिप्रमाणात खाल्ल्यास कफाचा त्रास व सर्दी होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply