आता शहाळ्याचे काही घरगुती उपाय पाहुयात:
१)जुलाब होत असल्यास १ ग्लास शहाळेयाच्या पाण्यात १/४ कप संत्र्याचा रस ४ चमचे लिंबू रस व १/४ चमचा सैंधव घालून प्यावे हे मिश्रण ओ.आर.एस ची भूमिका बजावते.
२)लघ्वीला जळजळ होत असल्यास व लघ्वी कमी होत असल्यास शहाळ्याचे पाणी प्यावे.
३)लहान मुलांना जंतांचा त्रास होऊन उल्टी होत असल्यास १/४ कप शहाळ्याचे पाणी+१/२ चमचा ओवा व १ चमचा लिंबाचा रस हे मिश्रण पाजावे ह्याने वारंवार होणाऱ्या उल्ट्या थांबतात.
४)कर्करोगा सारख्या आजारात जेव्हा तीक्ष्ण औषधे दिली जातात तेव्हा शरीरातील विषार लघ्वी मधून बाहेर टाकण्यासाठी शहाळ्याचे पाणी उत्तम.
५)मानसिक श्रम अधिक होत असल्यास १ ग्लास शहाळेयाच्या पाण्यात २ चमचे मध घालून ते मिश्रण संध्याकाळी घ्यावे.
६)१ कप शहाळ्याचे पाणी त्यात १/२ चमचा हळद व ४ चमचे चुन्याची निवळी घालून त्या मिश्रणाच्या घड्या भाजलेल्या त्वचेवर ठेवाव्या.
७)कोवळ्या शहाळेयाची मलई चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात व चेहऱ्याच्या मांसपेशींना बळ मिळते.
८)मोठी शस्त्रक्रिया होऊन जेव्हा प्रथमच आहार सुरू करतात तेव्हा रूग्णाला आधी शहाळ्याची मलई द्यावी.
९)पोटात जळजळ होऊन भुक लागते त्यावेळेस शहाळ्याची मलई खावी फायदा होतो.
१०)सर्दी होण्याची सवय नसल्यास लहान मुलांना शहाळ्याची मलई पातळ करून भरवावी ती शक्तीर्धक असते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply