आता आपण ओल्या नारळाचे घरगुती उपयोग पाहुयात:
१)कृमी मध्ये नारळाचे दुध १/२ कप सकाळी अनशापोटी प्यावे व नंतर तासाभराने एरंडेल तेल प्यावे.
२)हाता पायांना पडलेल्या भेगांवर चुन्याची निवळी+ एरंड तेल+ नारळाचे दुध हे मिश्रण घोटून मलम करावे व लावावे.
३)नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या केशर,वेलची,जायफळ घालून कराव्या ह्या फुफ्फुसे बळकट करतात.
४)गोवा कोकण भागामध्ये नारळाचे दुध काढुन त्यात कोकम,मिरची,लसूण,मीठ घालून सोलकढी करतात जेवणानंतर शेवटी भातात मिसळून खाता ही पाचक असते.
५)ओले खोबरे व गुळ हे मिश्रण बल व बुद्धीवर्धक आहे.
६)किसलेले खोबरे व खोबरेल तेल एकत्र शिजवून त्याचा पोटीस हा सुज व मार लागलेल्या जागी बांधला असता वेदना कमी होतात.
७)ओल्या नारळाचा रस व शहाळ्याचे पाणी हे मिश्रण लघ्वी कमी होत असल्यास प्यावे ह्याने लघ्वी सुटायला मदत होते.
८)नारळाचे पाणी १ लिटर भर घ्यावे व काकवी सारखे होई पर्यंत आटवावे मग त्यात जायफळ,सुंठ,मिरी,वेलची,जायपत्री ह्यांची पुड घालून बाटलीत भरून ठेवावे हे मिश्रण पोटदुखी किंवा पोटात आग होत असल्यास १० मिली दिवसातून २ वेळेस सकाळ संध्याकाळी २ आठवडे घ्यावे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply