आता आपण खोबरेल तेलाचे घरगुती उपयोग पाहूयात:
१)खोबरेल तेल व चुन्याची निवळी हे मिश्रण घोटून केले मलम केसांना लावल्यास केस गळणे थांबते.
२)थंड हवेशी संपर्क आल्याने त्वचा फुटते ह्या करीता खोबरेल तेल व लोणी हे मिश्रण समभाग मिसळून त्वचेवर लावावे.
३)खोबरेल तेल अंगाला नियमीत चोळल्यास मांसपेशी व स्नायू पुष्ट होतात.
४)संडास करताना व नंतर गुदद्वाराची आग होत असल्यास खोबरेल तेलाचा फाया गुदद्वारात ठेवावा.
५)लहान मुलांची टाळू भरायला खोबरेल तेल टाळूवर लावावे.
६)बोटांना होणाऱ्या कोरी बऱ्या होण्सासाठी त्यावर लोखंडी न गांजलेली सुरी तापवून त्यावरून खोबरेल तेल सोडावे.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply