पिकलेली पपई हि चवीला गोड,थंड असून पित्तनाशक असते.
आता पिकलेल्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात:
१)जेवणानंतर काही वेळाने पिकलेल्या पपईच्या १-२ फोडी खाल्ल्याने अन्न पचन सुलभ होते.
२)बाळंतीण बाईला जेवणानंतर पपई खायला दिल्यास तिला भरपूर दुध येते.
३)ज्या स्त्रीयांना मासिक पाळीच्या वेळी स्त्राव कमी होतो त्यांनी पपई खावी व ओटी पोटाला एरंडेल तेलाने मालीश करावे.
४)पपईच्या बियांचे चुर्ण १-२ चमचे गरम पाण्यासह दीर्घ काळ सेवन केल्याने कृमिंचा प्रादुर्भाव कमी होतो.
५)प्रसुतीनंतर गर्भाशय संकुचित होऊन रक्तस्राव थांबावा म्हणून पपईच्या बियांचा रस काढुन प्यावा व ओटीपोटाला देखील हा रस + एरंडेल तेल हे मिश्रण चोळावे.
पपई हि गरोदर स्त्रीने खाऊ नये कारण पपई मध्ये गर्भाशय संकोच करण्याचा गुण असल्याने त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.
तसेच पपईचे अतिसेवन केल्यास बायकांना मासिक पाळीच्या वेळेस अतिरक्तस्त्राव होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply