शबरीने श्रीरामांना स्वत: चाखून अर्पण केलेली ही बोरे श्रीरामांनी अगदी आवडीने खाल्ली होती.
खरोखरच हि बोरे फारच रूचकर लागतात व विशेष करून उन्हाळयात मिळणारे हे रान फळ आहे.
ह्याचा मध्यम आकाराचा वृक्ष असतो जो काटेरी असतो व त्याला छोटी छोटी काटेरी पाने असतात.
कच्ची बोरे हि चवीला तुरट आंबट उष्ण असून ती शरीरात कफ पित्त दोष वाढवितात.तर पिकलेले बोर हे उष्ण असून वात पित्त दोष वाढवितात.
आता हि बोरे फक्त काहीच ऋतू मध्ये उपलब्ध असल्याने ती सुकवून ठेवतात व वापरतात.
ह्यांच देखील उपयोग घरगुती उपचारात केला जातो.कसा ते पाहुया:
१)अंगावर पित्त उठत असल्यास व खाज येत असल्यास बोराचा रस किंवा गराची चटणी अंगावर लावावी.
२)वारंवार तहान लागणे,घसा कोरडा पडणे,जीभ सुकणे ह्यावर पिकलेली गोड बोरे खावीत.
३)उमासे,कोरड्या उल्ट्या येत असल्यास बोरे खावीत.
४)जुलाब होणे,भुक न लागणे ह्यावर सुक्या बोराचे कढण डाळींबाचे दाणे,काळी मिरी,सैंधव घालून खावे.
५)वारंवार उचकी लागत असल्यास आंबट गोड बोरे खावी तसेच बोराच्या बीचे वरचे आवरण फोडून त्यातील गर उगाळून त्यात २ चमचे तुप+ १ चमचा मध घालून चाटण करून चाटावे.
बोरे खायचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास होतो.कच्ची बोरे तर कधीच खाऊ नये.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply