कपाळावर मिरी वाटणे हा वाक्प्रचार तर सगळयांनाच माहीत असणार त्यात काही नवल नाही.मसाल्या मधला अजून एक पदार्थ ज्याला मसाल्या मध्ये मानाचे स्थान आहे ती म्हणजे मिरी.
आपल्या रोजच्या जेवणात आमटी मध्ये,गरम मसाला बनवताना मिरीचा सर्रास वापर केला जातो.असा हा तिखट झणझणीत पदार्थ जेवणाला एक वेगळीच लज्जत आणतो.
मिरीचा वेल असतो आणी त्या वेलीला उगवणारी ही फळे चांगली तयार झाल्यावर उन्हात वाळवून ठेवली जातात.ही चवीला तिखट असतात आणी ब-या पैकी उष्ण असतात.हि शरीरातील कफ आणी वात दोष कमी करते पण पित्त मात्र वाढवते.
चला आता मिरीचे काही घरगुती औषधी उपयोग पाहूयात.
१)घसा बसला असल्यास जेवणानंतर १/४टिस्पून मिरपुड तूपात मिसळून खावी चांगला फायदा होतो.
२)सर्दी होऊन डोके देखील जड झाले असल्यास १/४ चमचा मिरपुड मधासोबत मिसळून घेणे आराम मिळतो.
३)पोटात दुखत असल्यास १/४ चमचा मिरपुड आणी २ चिमूट भाजलेला हिंग हे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
४)मार लागून रक्त साखळले असल्यास मिरी पाण्यात वाटून त्याचा लेप त्या जागी लावला असता तिथली सूज आणी वेदना देखील कमी होते.
५)मिरीचे चूर्ण किडलेल्या दाढेत ठेवले असता तिथला ठणका कमी व्हायला मदत होते.
अतिवापराने छातीत जळजळ,पोटात आग होणे तसेच संडास,लघवी ,व नाकातून रक्त स्त्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply