लिंबू अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके फळ.ह्या फळाचा आपण खायला तर उपयोग करतोच जसे लिंबू सरबत,लोणचे ते हि वेग वेगळ्या प्रकारची,तसेच कोणत्याही पदार्थांची लज्जत वाढवायला ह्याचा रस आपण हमखास त्या पदार्थावर पिळतो.तसेच हे फळ फक्त खायलाच वापरले जाते असे नाही बरं का ह्या बिचाऱ्याचा उपयोग जारण मारण अर्थात काळ्या विद्येत करतात म्हणे,तसेच दृष्ट बाधा होऊ नये म्हणून आपण लिंबू मिरचीचे तोरण आपल्या घर वाहन ह्याला लावतोच ना! तर मंग असा हा बहुपयोगी लिंबू.ह्या फळाने अगदी आनंद,आजारपण,वाईट काळ ह्या सर्वांत आपली साथ न सोडण्याचा जणू पणच केला आहे.
असा हा बहुपयोगी मित्र लिंबू.
ह्याचे मोठे झुडूप असते.ह्याच्या फांद्यावर काटे असतात.पाने गोल,तेलकट,हिरवी चमकदार व विशिष्ट गंधयुक्त असतात.ह्याचे दोन भेद आहेत गोल,व पातळ पिवळी साल असलेला आणी दुसरा लांबट जाड हिरवी साल असलेला.
मला पिवळे रसरसशीत लिंबू जाम आवडतात बुवा.
लिंबु हा चवीला आंबट,उष्ण व वातनाशक आहे पण हा पित्त व कफ वाढवतो.
चला आता ह्याचे काही घरगुती उपचार पाहूया:
१)संडासमधून आव पडणे किंवा पातळ जुलाब होणे ह्या लिंबू गरम करून त्याचा रस काढावा व त्यात सैंधव व साखर मिसळून थोड्या थोड्या वेळाने १/२ चमचा पित रहावे.
२)अजीर्ण,उल्ट्या,तोंडाला चुळा सुटणे ह्यात लिंबाचा रस १ चमचा+ मध २ चमचे हे मिश्रण चाटावे.
३)अजीर्णा मुळे घशाशी आंबट येत असल्यास २ चमचे लिंबू रस+ १/४ कप गार पाणी+ १ चिमूट खायचा सोडा हे मिश्रण घ्यावे.
४)लघ्वीतून खर पडत असल्यास लिंबाचा रस १ चमचा+कोथिंबीर रस १ चमचा हे मिश्रण कोमट पाण्यातून २-३ वेळा दिवसातून काही दिवस घ्यावे.
५)लिंबूरसात हळकुंड उगाळून त्यात १ चिमूट कापूर घालून हे मिश्रण सर्वांगास चोळावे ह्याने त्वचे खाली असणारी चरबीची फाजील वाढ थांबते.तसेच त्वचा निरोगि व चांगली राहते.
६)एरंडेल लिंबूरसात घालून त्याचे मलम करावे व हे मलम पायांच्या भेगांना,त्वचा मऊ व्हायला व Natural After shave lotion म्हणून आपण वापरू शकता.
लिंबू प्यायचा अतिरेक केल्यास दात आंब्यात व ठिसूळ होतात,तसेच हाडांवर देखील ह्याचा दुष्परिणाम दिसतो,त्यांच प्रमाणे सर्दी होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply