ब)ताकावरचे लोणी:
१)हे लोणी लहान मुलांना अत्यंत पोषक आहे.त्यांना जेवणासोबत ३ भाग लोणी व १ भाग मध असे मिश्रण द्यावे(फक्त शाकाहार करत असतानाच हा उपाय करावा मांसाहार जेवणासोबत नाही).
२)रसायनांशी संपर्क,उन्हाचा प्रभाव ह्यामुळे त्वचेचा वर्ण खराब होतो तेव्हा त्वचेवर लोण्याचा लेप लावावा व पोटात देखील लोणी घ्यावे वर्ण सुधारतो.
३)गर्भिणी स्त्रीने नियमीत आपल्या आहारात लोणी ठेवावे त्यामुळे माता व गर्भ दोघांचेही आरोग्य उत्तम रहाते.
४)मुळव्याधीची तक्रार तसेच त्यात वेदना,रक्त पडणे,संडासला घट्ट होणे,संडासच्या जागी दाह होणे अशा तक्रारी असताना त्या व्यक्तिने १ ग्लास दुधामध्ये १ मोठा चमचा लोणी घालून रात्री घ्यावे व जेवणामध्ये बिनमसाल्याची दुधीभोपळ्याची भाजी खावी आराम मिळतो.
लोण्याच्या अतिसेवनाने वजन वाढते व शरीरातील मेद वाढतो.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Leave a Reply