ह्याच्या सुंदर रंगावरून ह्याला वांगे हे नाव पडले असावे.बायकांचा फेव्हरेट वांगी कलर हो.वांगीची भाजी हि ब-याच मंडळीची आवडीची बुवा.वांगीच भरीत,रसभाजी,कापं,वांगी भात,भरली वांगी,वांगीचं लोणचे,वांगीची आमटी सगळेच पदार्थ सुरेख लागतात बुवा.
हि वांगी लहान व मोठी अशा दोन आकारात मिळतात बरं का.दोन्ही छान लागतात.वांगीचे रोप हे कंबर भर उंच असते व त्यात हि गोल गोमटीफळे लागतात जी आपण भाजी करीता वापरतो.जसा हिचा उपयोग स्वयंपाकात होतो तसाच हिचा आपण घरगुती उपचारात देखील उपयोग करू शकतो बरं.
वांगे हे चवीला तुरट,कडवट,तिखट असे मिश्र चवीचे असून उष्ण असते त्यामुळे ते शरीरातील वात पित्त व कफ हे तीन्ही दोष कमी करते.पण वांग्यावर केल्या जाणा-या संस्काराचा जबरदस्त परिणाम होतो बरे का ह्याचा अर्थ असा कि आपण जर वांग्याची रस भाजी केली अर्थात बटाट व पाणी ह्या सोबत वांगे शिजवल्यावर ते हमखास वात वाढवणार पण तेलात तळलेले काप व वांग्याचे भरीत वात कमी करणार, आहे ना हि गंमत संस्काराची.
आता वांग्याचे घरगुती उपचारात उपयोग पाहुया:
१)वांग्याचे गुळ घालून केलेले भरीत संध्याकाळी खाल्ल्यास छान झोप लागते.
२)गळवे पिकुन सूज कमी व्हायला वांगी भाजून त्याचे पोटीस बांधावे.
३)कोरडा खोकला येऊन घशाला कोरड पडत असल्यास १ कप कच्च्या वांग्याचे तुकडे ४ कप पाण्यात १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात १/२ चमचा हळद व १ चमचा खडीसाखर घालून ते पाणी प्यावे.
४)कोवळ्या वांग्याचे तुकडे रात्रभर पाण्यात भिजत घालावे व सकाळी ते तुकडे काढुन त्या पाण्याने हात धुवावे.ह्याने तळहातावर येणारा घाम कमी होतो.हा प्रयोग ३ आठवडे करावा.
५)डोळे दुखत असल्यास वांग्याच्या रसांच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात आराम मिळतो.
वांगे अतिमात्रेत खाल्ल्याने पोटात वात धरून संडासला साफ न होण्याची तक्रार होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply