उपावासा साठी प्रसिध्द असा हा पदार्थ.काही जण हा कंद नुसता उकडून देखील आवडीने खातात किंवा मग ह्याच्या पिठाचा वापर वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.
हा काळा जाडसर साल असणारा कंद अातून मात्र पांढरा शुभ्र असतो.जसा ह्याचा उपयोग स्वयंपाकात केला जातो तसाच ह्याचा घरगुती उपचारात देखील वापर केला जातो.
शिंगाडा चवीला गोड तुरट असतो व थंड असतो त्यामुळे तो शरीरातील वात व कफ दोष वाढवितो तर पित्त दोष कमी करतो.
चला मग ह्याचे घरगुती उपचार पहायचे ना:
१)अम्लपित्तामध्ये १ टेबल संपून शिंगाडा पीठ + १ कप दूध+ १ कप पाणी घालून खीर करावी व त्यात खडीसाखर घालून रोज ४ तासांनी एकदा हि खीर थंड करून खावी.
२)पित्तामुळे अतिभूक लागून काही व्यक्ती खुप खातात त्यांना शिंगाड्याच्या पिठाचा तुपावर परतून केलेला शिरा खायला द्यावा.
३)शरीरात रक्त कमी असल्यास १ मोठा चमचा शिंगाडा पीठ व १ काळा खजूर तुपावर परतून गोळा बनवावा व असा गोळा रोज सकाळी उपाशी पोटी खावा व मग त्यावर तासभर काही ही खाऊ नये.
४)डोळ्याची आग होणे,डोळे लाल होणे ह्या तक्रारींवर शिंगाडा पीठ तूपावर परतून रात्री चघळून खावे हा प्रयोग २ महीने करावा.
५)आतड्यातून अन्न लवकर पुढे सरकल्यास संडासला साफ न होणे,वारंवार दुर्गंध युक्त संडास होणे,पातळ भसर संडासला होणे ह्या तक्रारी सुरू होतात.त्यावेळी शिंगाडा पीठाची भाकरी मसूरच्या कढणासह खावी ह्याने आतड्याची गती नियंत्रणात रहायला मदत होते.
शिंगाडा पीठ अतिमात्रेत खाल्ल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply