An Apple A Day Keeps Doctor Away अशी एक इंग्रजी म्हण आहे त्यात कितपत तथ्य आहे हे ती म्हण निर्मात्यालाच ठाऊक असेल कदाचित.सफरचंद तसे प्रत्येकाचे आवडीचे फळ.ह्याचे अॅप्पलपाय,अॅप्पल जॅम,अॅप्पल चटणी,लोणचे,ज्यूस असे अनेक प्रकार खायला व प्यायला मिळतात.आणी ते रूचकर देखील लागतात.
असे हे सफरचंद आपण किरकोळ शारीरिक तक्रारींमध्ये सुद्धा वापरू शकतो.हे थंड प्रदेशात पिकणारे फळ असून ह्याचा वृक्ष असतो व सफरचंद कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर लालासह गुलाबी होते.
पिकलेले सफरचंद हे गोड थंड पित्त व कफ दोष कमी करणारे व वातकर असते.चला आता ह्याचे उपयोग पाहूयात.
१)पचन शक्ती कमी होऊन भूक मंदावली असल्यास सफरचंद वाफवून त्यावर मिरपुड व सैंधव मीठ लावून खावे.
२)शौचास पातळ होत असेल अथवा आव पडत असेल तर पिकलेले सफरचंद चांगले चावून खावे.
३)सफरचंद गरम पाण्या १० -१५ मिनिटे भिजत ठेऊन त्याची साल काढुन ते बारीक वाटून घ्यावे नंतर त्यात सफरचंदाच्याच वजना इतके मध घालावे व पुन्हा घोटावे मग त्या वेलची,केशर,गुलाबकळी,गुलाबपाणी,जायपत्री,भीमसेनी कापूर घालून ते चांगले घोटावे.ह्याला मधुचंद म्हणतात ह्याचे सेवन अशक्तपणा मध्ये करावे तसेच ह्याने हृदयाला बळ मिळते.मधुचंद सेवन करताना मासे,दही,तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
४)अति मांसहारी व तिखट पदार्थ खाल्ल्यावर छातीत जळजळ होणे,पित्ताचा त्रास होणे ह्यात सफरचंद खावे.
सफरचंद खायचा अतिरेक केल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply