4 सप्टेंबर 1962 रोजी गुजरातमधील बडोदा शहरात किरण मोरेचा जन्म झाला. सय्यद किरमाणीची जागा त्याने समर्थपणे चालवली, फलंदाजीत खालच्या क्रमांकावर येऊन अनेक झुंजार खेळ्या केल्या आणि त्याच्याच नगरभावाने (नयन मोंगिया) आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु केल्यानंतरही काही काळ किरण देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत राहिला.
भारतीय संघात निवड होण्यापूर्वीच किरण इंग्लंडमधील नॉर्थ लॅंकेशायर लीग स्पर्धेत सहभागी झाला होता. 1982-83च्या हंगामातील वेस्ट इंडीज दौर्यात त्याला प्रत्यक्ष खेळण्याची संधी मिळाली नाही. जून 1986मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून त्याने पदार्पण केले. या मालिकेत त्याने 16 झेल लपकले आणि फलंदाजांच्या सरासरीमध्ये त्याच्याहून सरस फक्त एकच जण होता ! नियमित (मान्यताप्राप्त) फलंदाज अपयशी झाल्यानंतर हमखास ‘चालणारा’ फलंदाज म्हणून किरणची क्षमता या पहिल्या मालिकेतच दिसून आली. त्यानंतर सुमारे सात वर्षे तो भारताचा नियमित यष्टीरक्षक राहिला.
1988-89च्या हंगामात मद्रासमध्ये किरणने पहिल्या डावात एकाला आणि दुसर्या डावात पाच जणांना यष्टीचित केले. वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने केलेली ही कामगिरी आजही विक्रमी ठरते. सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीच्या प्रारंभकाळात काही काळ किरण मोरे हा भारतीय संघाचा उपकर्णधार होता.
1993-94च्या हंगामात बडोद्याचाच नयन मोंगिया हा निवडकर्त्यांची पसंद ठरला. नयन-किरण दोघेही उपलब्ध असताना किरणचा ‘फलंदाज’ म्हणून बडोद्याच्या संघात समावेश होत असे. सय्यद किरमाणीनंतर किरण जसा भारताचा यष्टीरक्षक झाला अगदी तसाच ‘त्यांच्या’नंतर तो निवडसमितीचा अध्यक्षही झाला. अध्यक्ष मोरेंच्या संघाने ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्याचे धोरण राबविले आणि धोनीच्या संघाने विसविशीत विश्वचषक जिंकूनही दाखवला.
4 सप्टेंबर 1971 रोजी
लीकडच्या काळातील एका हरहुन्नरी खेळाडूचा जन्म झाला. 1991पासूनच लान्स क्लूस्नर दक्षिण आफ्रिकेतील नशुआ डॉल्फिन्स संघाकडून प्रथमश्रेणी खेळत होता. भारताविरुद्ध कलकत्त्यात नोव्हेंबर 1996मध्ये त्याने पदार्पण गाजवले. पहिल्या डावात त्याला मार पडला – तेव्हा तो
गोलंदाज म्हणून संघात होता. मोहम्मद अझरुद्दीनने त्याच्या एका षटकात सलग पाच चौकार लगावले होते. दुसर्या
डावात मात्र लान्सीने 64 धावा देऊन आठ भारतीय टिपले. आणखी 48 कसोट्या खेळूनही हीच त्याची सर्वोत्तम गोलंदाजी राहिली. 1999च्या विश्वचषक स्पर्धेत तो फक्त दोनदाच बाद झाला, चार वेळा सामनावीर ठरला आणि अखेर ‘विश्वचषकवीर’ही. एक सामना त्याचा संघ हरलाही नाही आणि जिंकलाही नाही…
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).
Leave a Reply