भारत हे एक कृषीप्रधान आणि प्रजासत्ताक (लोकशाही) राष्ट्र आहे हे ज्ञान पुस्तकातून मिळाले. परंतु याची वास्तविकता काही औरच आहे हे काळाने आणि अनुभवाने शिकविले.
असामान्य-अदभूत लोकशाही…… “लोकांनी-लोकांसाठी चालविलेले राज्य लोकशाही होय” परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, “निवडक लोकांनी-स्वतःसाठी व काही निवडक लोकांसाठी चालविलेले राज्य आणि केलेली सोय लोकशाही होय!”
“शीरी फाटकच छत्र – अन्न वस्त्राचा अभाव,
जरी बळहीन तरी बळीराजा त्याचं नाव…..!”
कृषीप्रधानता किती वास्तविक आहे हे उघड डोळ्यांनी दिसते. या कृषीप्रधान व्यवस्थेचा पाया-कणा अर्थातच अस्सल शेतकरी सोडून बाकी सर्वांचेच हित होते हे या विशिष्ट व्यवस्थेचे वैशिष्ट्य आणि अस्सल शेतकरी वर्गाचे दुर्दैवच! पिकास भाव-कर्ज-वीज आणि अश्या अनेक समस्यांनी त्रस्त-वैतागलेला शेतकरी आत्महत्या करतो तरी ही कथित कृषीप्रधान व्यवस्था कागदावरच कार्यरत राहते…..!
— आय एस काझी
Leave a Reply