संभाव्य परिणामांचा विचार न करता काहीही करण्याची हल्लीच्या कलियुगातील मर्त्य माणसाची तयारी तापदायक आहे. अशी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत जाऊन तो नरकाकडे ओढला जाणार, हे सृष्टीचे सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांनीच पाच हजार वर्षांपूर्वी श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत या पवित्र ग्रंथांत स्पष्टपणे सांगितले आहे. माणसाचे हे नैतिक अधःपतन केवळ त्याच्या मनात कृष्णभक्तीचा अभाव असल्यानेच होत असल्याचे जगभरात श्रीकृष्णभक्तीचा प्रसार करणार्या इस्कॉनचे (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) प्रचारक आणि वेदांताचे अभ्यासक लक्ष्मीनारायण प्रभू सांगतात.देशाच्या प्रजासत्ताकदिनी नुसत्या संशयावरून पतीने पत्नीच्या प्रियकराला जाळून मारणे आणि प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्याला पेट्रोल भेसळ करणार्या माफियांनी जाळून मारणे या घटना तुमच्या आमच्यांसाठी चर्चेचा विषय ठरल्या. मनमाड आणि औरंगाबाद शहरातील या दोन प्रातिनिधिक घटनांप्रमाणेच राज्य आणि देशाच्या कानाकोपर्यात दर सेकंदाला अशा किती तरी घटना घडत असतील. यामध्ये अनेकांचा मृत्यू होत असेल. या विपरित घटनांच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीनारायण प्रभू यांच्याशी चर्चा केली असता प्रमाणबद्ध ग्रंथसंपदेच्या आधारे त्यांनी अशी अमानवीय कृत्ये करणार्या माणसांच्या प्रवृत्तीचे वर्णन केले. त्यांच्या मते या घटना म्हणजे येणार्या कलियुगाची नांदीच आहेत. ते म्हणाले, की ४ लाख ३२ हजार वर्षांचा कालावधी असलेल्या कलियुगातील पाच हजार वर्षे संपली असून उपर्वरित ४ लाख २७ हजार वर्षांत घोर कलियुग कशा प्रकारचे असेल या कलियुगातील माणसांचे कृत्य कसे असेल याचे इत्यंभूत वर्णन श्रीमद्भागवत ग्रंथात करण्यात आले आहे. या कलियुगात सारे वर्ण शूद्र च्या स्वरूपात होती
. अध्यात्मिक कुटी अर्थात तपस्वींच्या साधनेची ठिकाणे भौतिकतावादी घरांसारखी होतील. सार्या गाईंची शारिरीक ठेवण शेळ्या-बकर्यांप्रमाणे होईल. पारिवारिक संबंध नजिकच्या विवाह संबंधापर्यंतच मर्यादित राहतील.कलियुगाच्या पबळ प्रभावामुळे धर्म, सत्य, पावित्र्य, क्षमा, दया, आयुष्य, शारिरीक बळ तसेच स्मरणशक्ती दिवसेंदिवस क्षीण होत जाईल. ज्या व्यक्तीकडे पैसा, संपत्ती असेल त्या व्यक्तीला उत्तम
गुणांची खाण समजले जाईल. पुरुषत्व आणि स्त्रीत्व हे संबंधितांच्या कामशास्त्राताल निपुणतेनुसार ओळखले जाईल. या घोर कलियुगाच्या शेवटी अर्थात ४ लाख शेवटी सृष्टीचे सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्ण विष्णुयशा नावाच्या बाह्मणाच्या घरी शंभल नावाच्या बावात कल्कि नावाने अवतरित होतील. देवदत्त नावाच्या घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन पृथ्वीवर फिरणार्या राजाच्या वेशातील लाखो डाकूंना ठार करतील. त्यावेळी पुढील सत्ययुगाची लक्षणे प्रकट होतील. सूर्य विवस्वान तसेच चंद्रदेवांचे पवित्र वंश पुन्हा सुरू करतील.बाळासाहेब शेटे (मो.९७६७०९३९३९)
bshetepatil@gmail.com
— बाळासाहेब शेटे
Leave a Reply