कृष्ण मुरारी
कृष्ण मुरारी, कृष्ण मुरारी,
हा गौळ्याघरी करी चोरी.
दही, दुध, लोणी चोरुनी खाय,
नंदाच्या हरीला बोलु मी काय.
नटखट तुझा ग लाड़का कान्हा,
वाटेवरी घाली धिंगाणा.
माय यशोदे सांग तु त्याला,
लागु नको तु आमुच्या नादाला.
प्रमोद पाटील
— प्रमोद पाटील
Leave a Reply