साहित्य:
२५० ग्रॅम लांबट कण्यांचा तांदूळ
एक टेबलस्पून बेदाणे
दोन टेबलस्पून लिंबाचा रस
एक टेबलस्पून चारोळ्या
३ ते ४ केशर काड्या १ चमचा दूधात चुरुन घ्याव्यात
दोन चिमटी खाण्याचा पिवळा रंग (पाव टीस्पून पाण्यात कालवून)
४ ते ५ लवंगा
२ ते ३ वेलच्या
दोन टेबलस्पून तूप
कृती:
एका पातेल्यात तूप घाला. आधी धुतलेले तांदूळ वेळून घ्या. तुपात लवंगा व २-३ वेलच्या घाला. त्या जराशा परतून घेतल्यावर त्यात भात घाला. तांदूळ चांगले परतून घ्या. या मिश्रणाच्या दुप्पट पाणी करत ठेवा. तांदूळ खमंग परतले गेले, की त्यामध्ये हवी असेल तेवढी साखर घालून हलवत राहा. मग पाणी ओता. मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा. शिजत आल्यावर लिंबाचा रस घालून ढवळा. यावर बेदाणे व चारोळ्या घाला. भात जवळ जवळ शिजला की त्यामध्ये केशर व रंग घाला. हलवा व झाकण ठेवा. एक वाफ येऊ द्या. अशाप्रकारे गरमागरम सणासुदीसाठी खास केशरी भात तय्यार. यावर तुम्ही हवे असल्यास अन्य सुका मेवा वापरुन सजावट करु शकता.
— सौ.सुनिता मुकुंद वढावकर
Leave a Reply