सौंदर्याच्या दृष्टीने केसांचे अत्यंत महत्व आहे. केस गळणे, केसात कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे, केस तुटणे यासारख्या केसांच्या समस्या असतात.
या केसांच्या समस्यांनी आज अनेक स्त्री आणि पुरुष दोघेही ग्रासलेले आहेत. केसांची समस्या गंभीर असली तरीसुद्धा, आपण जर आपल्या जीवनशैलीमध्ये अगदी थोडासाच बदल केल्यास केसांच्या सर्व समस्यांचे सहजतेने निरसण होईल. यासाठी येथे काही सहज सोपे उपाय दिले आहेत.
केसांचे आरोग्या आपल्या संपूर्ण आरोग्यावरच अवलंबुन असते. जसे जर आपल्या शरीरातील रक्तसंचारण [Blood circulation] योग्य प्रकारे होत असल्यास त्यायोगे केसांच्या मुळांचे पोषण योग्य प्रकारे होते. यांमुळे केसांची मुळे घट्ट होतात. परिणामी केस गळणे, तुटणे यासारख्या समस्या होत नाहीत.
संतुलित आहार घ्यावा
तळलेले पदार्थ, आंबट, खारट, तिखट, मसालेदार आहाराचे प्रमाण कमी करावे. हवाबंद पदार्थ, जंकफूड, फास्टफूडच्या आहारी जाणे टाळावे. कारण अशा आहारात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन, जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, जिंक इ. पोषकतत्वे नसतात. केसांच्या आरोग्यासाठी वरील पोषकतत्वांनी भरपूर असणाऱया हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, दुध, अंडी, सुकामेवा विशेषतः बदाम यांचा आहारात समावेश करावा. पुरेसे पाणी वरचेवर प्यावे. यांमुळे रक्तसंचार सुधारण्यास मदत होते. मानसिक ताणतणाव रहित रहावे. नियमित व्यायाम करावा. यांमुळे रक्तसंचारण सुधारण्यास मदत होते. योग्य रक्तसंचारणामुळे केसांची मुळे घट्ट होतात. यांभुळे केस गळण्यासारख्या समस्या होत नाही. केसांच्या आरोग्यासाठी ‘ड’ जीवनसत्व अत्यंत उपयुक्त असते. यासाठी सकाळच्या कोवळ्या ऊन्हात काही वेळ उभे रहावे. व्यसनांपासून दूर राहणे हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. कारण धुम्रपान, मद्यपानाद्वारे अनेक विषारी घटक रक्तप्रवाहात येत असतात. त्यामुळे इतर आरोग्याच्या समस्येबरोबर केसांच्या समस्यासुद्धा उद्भवतात. धुम्रपान करणाऱया व्यक्तींचे केस लवकर पांढरे होतात.रासायनिक औषधे, कंडीशनरचा वापर हानिकारक ठरु शकतो. यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनानेच शक्यतो यांचा वापर करावा. यापेक्षा भृंगराजतेल, मेहंदी यांचा वापर करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply