|| हरी ॐ ||
स्वस्ताई आणि महागाई
जुळ्या दोन बहिणी
पाठीस पाठ लाउनी
जन्मास येती !
महागाई कॉमनमॅनच्या
पाचवीला पुजली,
स्वस्ताई तर
सगळ्यांना हवीहवीशी वाटली !
स्वस्ताई आणि महागाई
माणसे पैशामध्ये मोजती,
महागाईच्या मानाने
स्वस्ताईला किंमत लय भारी !
असतात सतत भांडत
एकमेकींची उणीदुणी काढत,
बहिणी बहिणींच्या भांडणात
कॉमनमॅन मात्र बसतो रडत !
सणासुदीच्या आधी
जाते महागाई व्यापारी आणि
साठेबाजांच्या स्वप्नी
घेते करवून आपल्या हिताच्या गोष्टी !
महागाई महा-घाईने सतत
डोके वर काढते,
स्वस्ताई सतत तिच्यावर
अंकुश ठेवत असते !
महागाई नेहमी आपले अस्तित्व
अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीत असते,
पेट्रोल डिझेलच्या भावाने
सर्व जगाला सतत वेठीस धरत असते !
जगातील सर्वच अर्थतज्ञ आणि मंत्री
यांच्यापुढे नेहमीच गुडघे टेकतात,
गोंधळलेल्या आणि दबावाखाली
आकड्यांची निरर्थक जुळवा जुळाव करीत असतात !
सरकारने दोघींना मोकळे रान दिले,
व्यापार्यांनी महागाईला हाताशी धरून
आपल्याला हवेते पदरात पाडून घेतले !
सत्ताधारी आणि विरोधकात महागाईवरून
होत असतात सतत भांडणे,
त्यांना नसते सल महागाईच्या विळख्याची
त्यांना असते कड त्यापासून मिळण्याऱ्या फायद्याची !
स्वत:चे अस्तित्व टिकविण्याच्या नादात
कॉमनमॅनची मात्र होत असते गोची,
त्याला नसते माहित
कोणाची ही मखलाशी !
जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply