दरवर्षी श्रावणात कृष्णमेघ येतो व आपल्या प्रेमजलधारानी धरणीला गाढ़ आलिंगन देऊन चिम्ब भिजवितो. कृष्ण मेघाने श्रावणास तसे वचनच दिले आहे. सुन्दर युवतीही या कृष्ण मेघाच्या प्रेमात पडतात आणि श्रावणी जलधारांचा मनसोक्त आनंद घेतात. जलधारांत भिजलेल त्यांच सौन्दर्य आणि गालात पडलेली खळी पाहून तरुणांचे ह्रदय घायाळ होणारच मग ते साठीचे असो वा सोळाचे. असा हा मायावी कृष्णमेघ.
पण दिल्लीत पोहचल्यावर कृष्णमेघ श्रावणाला दिलेले वचन सहजपणे विसरून जातो जसे इलेक्शन जिंकल्यावर दिल्लीचे नेता आपले ‘वादे’ नेहमीच विसरतात. म्हणूनच म्हण आहे:
“दिल्ली की बरसात
नेताओं के वादों की तरह
गरजते हैं मेघ
लेकिन बरसते नही हैं”..
श्रावणात दिल्लीत क्वचितच बरसणारा असा हा दगाबाज कृष्णमेघ. पण या वर्षी नवल घडल. कारणही तसंच होत. महागडे सोंदर्य प्रसाधने वापरून कुणी षोडशी अप्सरे समान सुन्दर दिसू लागते त्याच प्रमाणे कामनवेल्थ साठी बनलेले ‘महागडे, अति सुन्दर व नाजुक रस्ते’ पाहून हा श्रावणातला आवारा कृष्णमेघ सुन्दर व नाजुक रस्त्यांच्या प्रेमात पडला तर त्यात आश्चर्य काय! आपल्या प्रेम जलधारांचा वर्षाव कृष्णमेघाने रस्त्यांवर सुरु केला. या प्रेमालिंगानाने रस्तेही आनंदित झाले. त्यांच्याही गालांवर खळी पडल्या… अर्थात जागो-जागी खड्डे पडले. मग रस्त्यांवरून जाणारी वाहने या खड़यांच्या प्रेमात पड़ले तर नवल काय! कित्येक वाहने घायाळ झाली आणि ‘वर्कशॉप’ मधे पोहचली. कित्येक नेहमी करता कामातूनच गेली. वाहनांना घायाळ करणार असं हे रस्त्यांच आणि कृष्णमेघांच प्रेम!. दिल्लीत कॉमनवेल्थ होणार आणि रस्त्यांवर खड्डे ! शासनाची झोप उडाली. एक चौकशी समिति नेमल्यागेली. चौकशी समितीने निष्कर्ष काढला – श्रावणातला कृष्णमेघ
हाच याला जवाबदार आणि त्याचा हा परिणाम !
शासनाने आता तातडीने रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचे
काम सुरु केले आहे. तरीही कॉमनवेल्थचे आयोजक आणि शासन चिंतेत आहे. आवारा कृष्ण मेघाचा काय भरविसा. ओक्टोबर महिन्यात तो पुन्हा परतला तर काय होणार? रस्ते त्याचा प्रेमात पडतील आणि पुन्हा गालावर खळी … खड्डे …आणि कॉमनवेल्थच ???
— विवेक पटाईत
Leave a Reply