को जागरति?—- a scientific approach about कोजागिरी पौर्णिमा
आपल्याकडे साजरा होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ह्या स्वास्थ्याशी निगडीत असतात. गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने खाणे असो किंवा दिवाळीचे अभ्यंग स्नान असो,प्रत्येकात स्वास्थ्य जपणे उद्देश सापडतोच!
शरद ऋतूत येणारी “शारदीय पौर्णिमा” अथवा “कोजागिरी पौर्णिमा” साजरा करण्यामागे देखील स्वास्थ्याशी निगडीत हेतू सापडतो. कोजागिरी म्हंटले कि डोळ्यसमोर येते ते “मसाला दुध”! चंद्राच्या चांदण्यात वेलची पूड,बदाम वगैरे टाकून थोडेसे आटवलेले दुध गार करायचे आणि रात्री सेवन करायचे!!!
दुध गार करून पिणे एव्हढाच हेतू अपेक्षित नाहीये तर चंद्राच्या प्रकाशात ते गार करणे अपेक्षित आहे.
शरद ऋतू हा पित्ताच्या प्रकोपाचा काळ असतो. पित्ताची उष्णता वाढल्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. स्वस्थ राहण्यासाठी ऋतू प्रमाणे आचरण करणे गरजेचे असते. रात्र आणि दुध दोन्ही गोष्टी स्वभावत: शीत म्हणजेच थंड गुणधर्माचे असतात. पौर्णिमेचा चंद्र आणि त्याचे चांदणे तर शीतलता देण्यास अधिक उपयुक्त असतात. स्वभावत: शीत गुणाचे दुध जर अशा शीतल चंद्रप्रकाशात ठेवले तर या “संस्कारांमुळे” त्याची गुणवृद्धीच होते आणि असे दुध शरीरास शीतलता देऊन पित्ताची उष्णता कमी करण्यास मदत करते.
या रात्रीस पूर्ण चंद्राचे चांदणे अनुभवण्यासाठी जागणे अनिवार्य असते.असे म्हणतात कि देवी रात्री संचार करत विचारत असते “ को जागरति? कोण जागे आहे??” जो जागा असेल त्याला समृद्धी देणार! या अख्यायीकेमागे देखील लोकांनी जागे राहून चंद्र चांदण्यांनी सिद्ध दुध घ्यावे असाच प्रांजळ हेतू सापडतो. देवादिकांच्या आशीर्वादाचे आमिष अथवा कोपाचे भय हे चातुर्मासाप्रमाणे इथेही लागू पडते!
आता हा हेतू च माहिती नसल्यामुळे त्याचे
“ we must meet and celebrate!!!!” होते आणि त्यात भेळ, पावभाजी अथवा इतर yummy पदार्थांसोबत “मसाला दुध” अशी theme असते. याने होते एकच की “वैद्याकडे रुग्ण वाढतात”!
जिथे चंद्राचा थंडावा अपेक्षित आहे तिथे रक्त बिघडवणारे भेळ ,पावभाजी इत्यादी पदार्थ मनसोक्त खायचे आणि मग रिवाज म्हणून त्यावर मसाला दुध प्यायचे हे सगळेच विपरीत आहे!
म्हणूनच खऱ्या अर्थाने “शारदीय कोजागिरी पौर्णिमा” साजरी करायची असेल तर काय केले पाहिजे हे वेगळे सांगायला नको, नाही का???
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
परिवर्तन आयुर्वेद
Leave a Reply