नवीन लेखन...

क्रेडिट/डेबिट कार्ड, स्वाईप मशिन कसे वापरावे याची माहिती.

क्रेडिट/डेबिट कार्ड, स्वाईप मशिन मिळविण्याकरिता काय करावे लागते तसेच ते कसे वापरावे याची माहिती.

नोटाबंदी हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी उचललेले पाऊल आहे. ज्यामुळे देशामध्ये विकासाचे नवीन मापदंड प्रस्थापित होतील. मोदींनी आता डिजिटल इकॉनॉमीच्या माध्यमातुन कॅशलेस इकॉनॉमीची ओळख भारतीयांना दिली आहे. भारतामध्ये नेहमीच कॅश इकॉनॉमीची गरज होती, पण नोटाबंदी मुळे आता लोकांना डिजिटल सिस्टीमचाही अधिक परिचय होईल. बँकांमध्ये जास्त खाती उघडतील, आपला उद्योग लहान असो अगर मोठा आता क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाईप मशिन ही काळाची गरज बनली आहे.

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाईप मशिनच्या सहाय्याने कसे वापरावे.
आपला उद्योग लहान असो अगर मोठा कामाचा किंवा वस्तूंचा किंवा सेवेचा तात्काल मोबदला मिळविण्याकरिता क्रेडिट/डेबिट कार्ड, स्वाईप मशिनसोबत वापरणे हा एक उत्तम उपाय आहे. हे मशीन मिळविण्याकरिता काय करावे लागते तसेच ते कसे वापरावे या मशीनला EDC (Electronic Data Capture) किंवा PDQ (Process Data Quickly) असेही म्हणतात. हे मशीन वापरण्याने बरेचसे धोके टाळता येतात. रोख रक्कमच नसल्याने कोणी लुटून नेऊ शकत नाही किंवा नोटा जीर्ण होत नाहित. परंतु, या बरोबर दुसरा धोका संभवतो. कार्डाची प्रत तयार करण्यात काही लोक पटाईत आहेत. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड सोबत जर गुप्त क्रमांक (पासवर्ड) मिळाला तर ते लोक त्या कार्डद्वारे खरेदी करू शकतील. सर्व साधारणपणे ही पद्धत सोपी, खात्रीशीर व तात्काळ पैसे मिळवून देणारी असल्याने माल किंवा सेवा विकणाऱ्याकरिता उत्तम आहे. यामुळे करचुकवेगिरीला बंधने पडतील व कर रचना सोपी व कमी खर्चिक होईल.

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाईप सोबत वापरण्याचे मूलभूत उपयोग
या पद्धतीचा मूलभूत उपयोग खरेदी-विक्रीची माहिती तसेच पैशाच्या हस्तांतराची नोंद करण्याकरिता होते. हे मशीन चार्ज कार्ड करिताही उपयोगी आहे. या पद्धतीत जास्त झालेले पैसे परत करण्याचीही सोय आहे. अशा मशीन द्वारा पैशांच्या हस्तांतराची खातरजमा वैयक्तिक ओळख क्रमांकाची (PIN i.e. Personal Identification Number) माहिती पडताळून करता येते. एका ठिकाणी एकापेक्षा जास्त व्यापारी असतील तर ते सर्व मिळून एकच मशीन वापरू शकतात.

स्वाईपमशीन द्वारा पैसे हस्तांतर करण्याची पद्धत
स्वाईप मशीन वापरण्याची पद्धत
पूर्वी फक्त क्रेडिट कार्डच स्वाईप मशीन बरोबर वापरता येत असे तेंव्हा त्याला क्रेडिट कार्ड टर्मिनल असे म्हणत. आता मात्र डेबिट कार्ड बरोबरही वापरता येते. हल्ली म्हणूनच त्याला ईडीसी किंवा पीडीक्यू मशीन म्हणून ओळखले जाते. ते वापरण्याची पद्धत खाली दिली आहे.
सर्वात प्रथम माल किंवा सेवा घेणारा म्हणजेच पैसे देणारा आपले कार्ड देणाराकडे सोपवितो.

ते कार्ड घेऊन रोखपाल ते स्वाईप मशीनला असलेल्या छोट्या चीरेतून ते एकदा फिरवेल.
हे कार्ड फिरवताना स्वाईप मशिन कांही महत्वाची माहिती स्वतः कडे साठवून ठेवतो. ती माहिती म्हणजेः कार्डवरील नांव, कार्ड क्रमांक, कार्ड वापराचा अतिम दिनांक तसेच व्यवहाराची जागा.

ही माहिती कांही सेकंदातच ही सेवा पुरविणाराला पाठवली जाते. त्या करिता इंटरनेट हे माध्यम म्हणून वापरले जाते. सेवापुरवठादार योग्य पैसे ज्याला द्यावयाचे त्याच्या खात्यात जमा करतो. या प्रकारे व्यवहार पूर्ण होतो.

जर काही अडकाठी आली तर सर्व माहिती भरण्याची सोय मशीनमध्ये असल्याने व्यवहार निश्चितपणे पूर्ण होतो. व्यवहार पूर्ण झाल्यावर मशीनमधून निघणारी छापील पावती रोखपाल कार्डधारकाला देऊन त्यावर सही घेतो. ही सही कार्डवरील सहीशी रोखपाल पडताळून पाहतो व वस्तू अगर सेवा ग्राहकाला दिली जाते. जर सहीमध्ये दोष आढळला तर ते कार्ड धारकाचे नसल्याचे समजते. ही एक सुरक्षाप्रणाली अशा व्यवहारात वापरली जाते.

भारतामध्ये कार्ड स्वॅपींग मशीन कोठे मिळते?
या मशीनचा उपयोग आर्थिक कारणाकरिता होत असल्याने याला सक्षम संस्थेची मंजूरी आवश्यक आहे. या करिता बँक तसेच कार्ड पुरविणाऱ्या संस्थाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. हे काम बँकेमार्फत होते व बँकेबरोबर काँट्रॅक्ट करण्याची आवश्यकता आहे. या करिता संबंधिताचा कमीत कमी सहा महिने व्यवसाय अस्तित्वात असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत कांही कागदपत्रे आवश्यक आहेत. ती खालीलप्रमाणेः-
1. पैसे स्वीकारणाराच्या ओळखीचा पुरावा.
2. व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा
3. व्यवसायाची परवानगी
4. जर एकापेक्षा जास्त मशीनची आवश्यकता असेल तर त्याकरिता अर्जामध्ये नोंद असणे आवश्यक आहे.

ईडीसी मशीनची किंमत तसेच भाडे प्रत्येक बँक स्वतः ठरविते. अर्ज करणाराला मशीन बसविण्याचे, जीपीआरएसचे मासिक भाडे तसेच इतर कर भरावे लागतात. ही सर्व माहिती बँक देते.

ईडीसी मशीन घेताना लक्षात ठेवण्याची माहिती:-
1. काँट्रॅक्ट मधील सर्व कलमे वाडून समजून घ्यावीत. त्यावर जर आक्षेप असतील तर त्यावर चर्चा करुन शक्य झाल्यास बदलून घ्यावीत.
2. सर्व प्रकारचा खर्च निश्चित स्वरुपात नोंदविला पाहिजे.
3. सर्वसाधारणपणे जी बँक जमाखर्च सांभाळते त्याच बँकेचे मशीन घ्यावे. त्यामुळे खर्च एकाच बँकेला देता येतो.

ईडीसी मशीन वापरताना घ्यावयाची काळजी
1. कार्ड तसेच स्लीपवरील सही एकाच व्यक्तीची असली पाहिजे. जर शंका आली तर पॅन कार्ड, आधारकार्ड किंवा वाहनचालक परवाना पाहून खात्री करुन घ्यावी.
2. ईडीसी मशीन वापरात नसताना त्याला कूलूप लावण्याची सोय असावी. दुरुपयोग होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक आहे.
3. हे मशीन वापरण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे.
4. व्यवहाराची कागदोपत्री नोंद ठेवण्याकरिता प्रिंटरची सोय आवश्यक आहे.

या बद्दलची अधिक माहिती खाली दिलेल्या लिंक वापरुन व्हिडीओ बघता येतील. https://www.youtube.com/watch?v=DIJzERqSTzg
How To Deposit Cash easily in SBI Cash Deposit Machine

In Hindi

State Bank Of India Launch Point of Sale Machine : https://www.youtube.com/watch?v=sds8MGijiPk
Chhota ATM: https://www.youtube.com/watch?v=In50rh6GNi8
How to Install Mini ATM:

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..