खान्देशात श्रावण महिन्यात विविध सण-उत्सव साजरे केले जात असतात. त्यातील प्रमुख उत्सव खान्देशवासीयांची कुलस्वामिनी कानुबाईचा उत्सव होय. श्रावणातील पहिल्या रविवारी हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी दुसर्या किंवा चौथ्या रविवारीही कानुबाईची स्थापना केली जाते. संपूर्ण खान्देशात कानुबाईची स्थापना करण्याची पारंपरिक पद्धत आहे. कानुबाईचा उत्सव हा तसा दोन दिवसांचा असतो, मात्र, पाच दिवसांत कानुबाईचे रोट (प्रसाद) खावा लागत असतो.
खान्देशात श्रावण महिन्यात पहिल्या रविवारी कानुबाईची स्थापना केली जाते. कानुबाईच्या उत्सवात कुटुंबातील ज्येष्ठांना मान दिला जात असतो. अर्थात, त्यांच्या घरी हा उत्सव पारंपरिक पद्धतीने पार पाडला जात असतो. त्यामुळे नोकरी किंवा उद्योग-धंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंबातील इतर सदस्यही या उत्सवास आवर्जून हजेरी लावत असतात. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन श्रावणाच्या पहिल्या रविवारी सकाळी कानुबाईची विधिवत स्थापना करतात. पूर्वी कानुबाईचे रोट दळण्यापासून तर मुखवटा आणणे, आदल्या रात्री तयारी करणे, स्थापनेच्या दिवशी दिवसभर कार्यक्रम व स्थापनेच्या रात्री व विसर्जन प्रसंगी पारंपरिक गीते व ओव्या म्हटल्या जात असत. मात्र आता या उत्सवातही आधुनिकता डोकावू लागली आहे. पारंपरिक ओव्या व गीते ऐकायला मिळत नाहीत. कानुबाईच्या ऑडिओ कॅसेट तसेच सीडीजमधील नव्या चालीतील गाणे घराघरातून ऐकायला मिळतात. एवढेच नव्हे तर कानुबाईची स्थापना, पूजा व विसर्जन या प्रसंगी करण्यात येणारे विधी व मंत्रोच्चार यांची ही सिडी बाजारात उपलब्ध झाली आहे. कानुबाईच्या उत्सवात कुटुंबातील ज्येष्ठांना मान दिला जात असतो. अर्थात, त्यांच्या घरी हा उत्सव पारंपरिक पद्धतीने पार पाडला जात असतो. त्यामुळे नोकरी किंवा उद्योग-धंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंबातील इतर सदस्यही या उत्सवास आवर्जून हजेरी लावत असतात.खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र कानुबाईचा उत्सव
हा पूर्वीप्रमाणेच साजरा केला जात असतो. पारंपरिक गाण्याच्या गजरात कानुबाईची स्थापना केली जाते.
कुटुंबातील लहान- मोठ्या पुरूष मंडळीच्या रोटांच्या (गहू) मुठी काढल्या जातात. खीर, पोळी व भाजी यांचा नैवेद्यदाखविला जातो. मग कुटुंबातील सर्व सदस्य प्रसाद ग्रहण करतात. उर्वरित रोट पुढील तीन-च
ार दिवसात संपवावे लागतात. आपल्या कुटुंबातील सदस्याशिवाय ते रोट दुसर्या कुणाला खाऊ देत नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कानुबाईच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक गाणी म्हणत, फुगडी खेळत आपल्या लाडक्या कानुबाईला निरोप दिला जातो. खान्देशासह संपूर्ण देशाची इडापिडा जाऊन देशात सुखसमृद्धी नांदावी, यासाठी कानुबाईला साकडे घातले जाते.बाहेरो विवाहाची प्रथा- कानुबाईचा उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असतो. या उत्सवात बाहेरो लग्नाची प्रथा आहे. त्यात सामूहिक विवाह लावले जातात. कानुबाई पोहचली परप्रांतात-खान्देशची कुलस्वामिनी आता परप्रांतात पोहचली आहे. खान्देशातील काही लोक नोकरी- व्यवसायासाठी गुजरात, मध्य प्रदेश राज्यात गेले आहेत. कामाच्या व्यापामुळे त्यांना कानुबाईच्या उत्सवात सहभागी होता येत नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचे रोट ते सोबत घेऊन जातात. परप्रांतात असले म्हणून कानुबाईच्या उत्सवाला पाठ देता येत नाही. त्यामुळे परप्रांतातही कानुबाईचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होताना दिसतो.
— संदीप रमेश पारोळेकर
Leave a Reply